Advertisement

पार्क साईट श्री-2017 बॉडी बिल्डिंग स्पर्धा


पार्क साईट श्री-2017 बॉडी बिल्डिंग स्पर्धा
SHARES

विक्रोळी - श्री राम युवा प्रतिष्ठानच्या वतीने 'पार्क साईट श्री-2017 बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत ऋषिकेश वायंगणकर हा ६५ वजनी गटात विजयी झाला आहे. ही स्पर्धा शनिवारी 4 मार्चला सायंकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आली होती. विक्रोळी पार्क साईट येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या मैदानात ही स्पर्धा झाली.

या स्पर्धेत 55, 60, 65 आणि 70 किलो असे एकूण चार वजनी गट करण्यात आले होते. शरीर सौष्ठव स्पर्धेत पार्क साईट येथील 12 व्यायाम शाळेतील मुले सहभागी झाले होती. प्रथम विजयी झालेल्या विजेत्याला 6,666 रुपयांचे बक्षीस आणि मानचिन्ह देण्यात आले. प्रत्येक वजनी गटातील 1 ते 5 क्रमांकाच्या विजेत्यांना 2000, 1500, 1200, 1000, 800 आणि 500 रुपये देण्यात आले. तसंच बेस्ट पोझ देणाऱ्याला 1000 रोख रक्कम देण्यात आली.

संबंधित विषय
Advertisement