Advertisement

मुंबई मेरी जान!


मुंबई मेरी जान!
SHARES

मुंबई म्हणजे किनारा... मुंबई म्हणजे उत्साह... मुंबईची खरी ओळख करुन देणारे काही निवडक फोटो आणि त्या फोटोंमागची कहाणी खास 'मुंबई लाइव्ह'च्या वाचकांसाठी...! 


मेधा म्हात्रे


मुंबई से हूँ बॉस!

आपण सर्वजण मुंबईत राहतो. पण मुंबईची छबी कुठे ना कुठे आपल्यात दिसून येते. आपले हृदय मुंबईसाठी धडकते आणि मुंबईचे हृदय आपल्यासाठी धडकते. मुंबई फक्त एक शहर नाही. तर स्वप्ननगरी आहे! 


रासेश राजा


मला हा कॉफी कप गिफ्ट म्हणून दिला आहे. माझ्यासाठी हा कप म्हणजे एखाद्या मित्रासारखा आहे. जिथे जातो तिथे हा कप माझ्यासोबत असतो. मुंबईच्या गल्ल्या-गल्ल्यांमध्ये मी हा कप फिरवला आहे. मुंबईचा इतिहास, मुंबईचे रस्ते, सिनेमा, मुंबईकर आणि त्यांचे स्पिरीट या सर्वांशी मी या कपची ओळख करून दिली आहे.  


दीप ठक्कर


काजल नावाची मुलगी रस्त्यावर अभ्यास करत बसली आहे आणि तिच्या बाजूला तिचे भाऊ-बहीण आहेत. काजलची आई मरीन ड्राइव्ह परिसरात फळं विकते. तिची इच्छा आहे की, तिच्या मुलीने अभ्यास करावा आणि खूप मोठे व्हावे.


विनीत जे.भिंडे


मुंबईनगरी फक्त माणसांसाठीच नाही तर पक्ष्यांसाठी सुद्धा आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. मुंबईतल्या मरीन डाईव्ह इथे रोज मुंबईकर भेट देतात. पण हिवाळयात बाहेरून आलेले पक्षीसुद्धा मुंबईला भेट देतात.  मुंबईसाठी गर्दी काही नवीन नाही. पण मुंबईकरांना कधी या गर्दीचा त्रास झाला नाही. सण असो किंवा कोणती आपत्ती असो, मुंबईत सर्वधर्म समभावच आढळतो. अशा परिस्थितीत हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन एकत्र येतात. अशा या मुंबईचा मी सुद्धा एक भाग आहे.


विनीत


गडबडधावपळ आणि गर्दी मुंबईचा हिस्सा झाली आहेपण एक शांत आणि सुंदर मुंबईसुद्धा इथे वसलेली आहेगोराई खाडीतून हा फोटो काढला आहेपॅगोडा रात्रीच्या वेळी खूप सुंदर आणि उठून दिसतो.


रामताप केलकर


७०व्या स्वातंत्र दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची ऐतिहासिक इमारत सजवण्यात आली होतीही इमारत ब्रिटिश शासनाची आठवण करून देतेआम्हाला आमच्या देशाचा अभिमान आहे. पण आम्हाला आत्मपरिक्षणाची गरज आहेआपण आपल्या ऐतिहासिक जागांची किंवा किल्ल्यांची नीट काळजीच घेत नाहीतत्यामुळे आपल्याला बदलणे गरजेचे आहे.


हर्षद जोशी


मी काढलेला हा फोटो मला खूप आवडला आहेमाझ्या फोटोंपैकी हा बेस्ट क्लिक आहे.


रुपाली शिंदे


मुंब्र्यातल्या एका पालिका शाळेत मी हा फोटो क्लिक केला आहेमुले क्लासच्या बाहेर बसून आपल्या पालकांची वाट पाहत आहेतमुलांचा निरागस चेहरा पाहून मी स्वत:ला फोटो काढण्यापासून आवरूच शकले नाही.   


शेखर ताम्हणे

माझ्या वडिलांच्या या पाऊलखुणा त्यांची आठवण आयुष्यभर जिवंत ठेवणार आहेत!


कव्हर फोटो सौजन्य



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा