Advertisement

चित्रातून साकारलं राजस्थान


चित्रातून साकारलं राजस्थान
SHARES

वरळी - नेहरू सेंटरमध्ये 24 ऑक्टोबरपर्यंत चित्रकार योजना डेहनकर यांच्या चित्रांचं प्रदर्शन सुरू झालं आहे. योजना यांच्या चित्रांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, प्रवासातले अनुभव, मनाला भावलेले प्रसंग आणि परिसर याचं प्रतिबिंब त्यांच्या चित्रांत दिसतं. या प्रदर्शनातली चित्रं त्यांच्या राजस्थान प्रवासावर आधारित आहेत. राजस्थानमधील ऐतिहासिक वास्तू कला आणि संस्कृती त्यांत साकारलेली आहे. ही चित्रं वेगवेगळ्या रंगसंगती आणि पोताचा वापर करून रेखाटण्यात आली आहेत. या प्रदर्शनात योजना यांच्या 30 पेंटिंगचा समावेश असून 7 हजार ते 35 हजारांदरम्यान या चित्रांच्या किंमती आहेत. योजना कॉम्प्युटर इंजिनिअरही आहेत. त्यांचा चित्रकार म्हणून अनेक पुरस्कारांनी सन्मानही झालाय. 2016 चा प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाउंडेशनचा वेस्ट सिल्व्हर झोन पुरस्कारही त्यांनी पटकावलाय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा