Advertisement

जीवनाला दिशा देणारी ५ प्रेरणादायी पुस्तकं

जागतिक पुस्तक दिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला अशीच काही पुस्तकं सांगणार आहोत. ही पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरतील.

जीवनाला दिशा देणारी ५ प्रेरणादायी पुस्तकं
SHARES

पुस्तकं ही आपली सगळ्यात चांगली मित्र असतात असं म्हणतात. काही पुस्तकं करमणुकीची साधनं म्हणून वाचली जातात. तर काही ज्ञानाचे भांडार म्हणून तर काही पुस्तकं आयुष्यातल्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शक ठरतात.  

जागतिक पुस्तक दिनानिमित्त (World Book Day) आज आम्ही तुम्हाला अशीच काही पुस्तकं सांगणार आहोत. ही पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरतील. 

१) Think and Grow Rich

 

  • मराठी नाव : विचार करा आणि श्रीमंत व्हा
  • लेखक – नेपोलियन हिल

विचारातून तुमचे आयुष्य कसे सफल सम्पूर्ण घडवू शकाल हे या पुस्तकातून समजावून सांगितले आहे. लेखकानं २० वर्षांच्या कालखंडात ५०० हुन अधिक व्यक्तींचे अध्ययन करून श्रीमंत आणि यशस्वी लोकांच्या सर्वसाधारण सवयी म्हणजे एकूणच त्यांची विचार करण्याची पद्धत यात सुरेख पद्धतीने उलगडून दाखवली आहे.


२) The 7 Habits of Highly Effective People


  • मराठी नाव : अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी
  • लेखक: स्टीफ़न आर. कवी

आपले आयुष्य सुखी आणि समृद्ध करण्यासाठी आधी आपले विचार बदलले पाहिजेत. आपण आपला दृष्टिकोन बदलून आपले जीवन कसे बदलू शकता हे या पुस्तकातून शिकता येते. या पुस्तकात अशा ७ सवयींचे वर्णन केलेले आहे ज्या प्रभावी लोकांमध्ये सामान्य आहेत. या ७ सवयी आपले चरित्र निर्माण करतात, ज्यामुळे आपण आपल्या जीवनात अधिक प्रभावी होऊ.


३) द पॉवर ऑफ युअर सुबकॉन्सियस माईंड


  • मराठी नाव : अंतर्मनाची ताकद
  • लेखक: डॉ. जोसेफ मर्फी
  • मराठी अनुवाद: सविता दामले

द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड (The power of your subconscious mind)” हे डॉ. जोसेफ मर्फी यांचे बेस्टसेलर प्रेरणादायी पुस्तक आहे.

या पुस्तकातून अंतर्मन (Subconscious mind) किंवा अवचेतन मन म्हणजे काय? आणि ते आपल्या जीवनाला कसे आकार देते? याचे विस्तृत ज्ञान आपल्याला मिळेल. आपल्या मनाचे योग्यरीत्या प्रोग्रामिंग करून आपण आपले आयुष्य आरोग्य, वित्त, मन: शांती, करिअर इत्यादी सर्व बाबींमध्ये सुधारू शकतो.  


४) द अल्केमिस्ट


  • मराठी नाव : द अल्केमिस्ट
  • लेखक: पाउलो कोएलो
  • मराठी अनुवाद: नितीन कोतापल्ले

“द अल्केमिस्ट” हे पाउलो कोएल्हो यांनी लिहिलेले बेस्ट सेलर पुस्तक आहे. हे पुस्तक मूळचे पोर्तुगीज भाषेतील आहे आणि मराठी, इंग्रजी सारख्या ८० भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.

या प्रेरणादायी पुस्तकातून लेखकानं आपल्याला ‘सँटियागो’ नावाच्या मेंढपाळ मुलाची कहाणी सांगितली आहे. सँटियागोचे एक स्वप्न आहे , त्याला जगातील सर्वात मौल्यवान खजिना शोधायचा आहे. हा मेंढपाळ मुलगा त्याच्या स्वप्नांचा पाठलाग कसा करतो आणि त्याला या स्वनापूर्तीच्या प्रवासामध्ये आलेल्या अनुभवांचे अतिशय सुंदर वर्णन आपल्याला या पुस्तकात मिळेल.


५) The monk who sold his Ferrari

  • मराठी नाव : संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली
  • लेखक: रॉबिन शर्मा

प्रख्यात मोटिवेशनल स्पीकर आणि लेखक रॉबिन शर्मा यांच्या “द मोंन्क हू सोल्ड हिज फरारी” (The monk who sold his Ferrari)” या पुस्तकाची मराठी आवृती म्हणजे “संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली “.

या पुस्तकात लेखकानं ज्युलियन नामक एका वकिलाची कथा सांगितली आहे जो आपल्या कारकिर्दीत खूप यशस्वी झाला. पण त्याला त्याच्या आयुष्यामधील इतर गोष्टीमध्ये समतोल राखता आलेला नाही. हृदयविकाराच्या झटक्यानंतर ज्युलियन आपल्या सर्व सुखसोयींचा त्याग करून मनःशांतीच्या शोधात हिमालयात जातो.

हिमायलायमध्ये त्याला योगी भेटतात. त्या योगिनी दिलेल्या ज्ञानामुळे ज्युलियनचे जीवन अर्थपूर्ण आणि आनंदी होऊन जाते. पुस्तकात वर्णन केलेल्या तंत्राचा वापर केल्यास त्यांचे जीवन अधिक अर्थपूर्ण बनू शकते.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा