Advertisement

साठ्ये कॉलेजमध्ये पुस्तकोत्सव


साठ्ये कॉलेजमध्ये पुस्तकोत्सव
SHARES

विलेपार्ले - विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचे प्रमाण कमी होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या बीएमएम विभागानं 'पुस्तकोत्सवाचे' आयोजन केलंय. या पुस्तकोत्सवाचा उद्घाटन सोहळा ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या हस्ते पार पडला. 'चित्रशताब्दी’, ‘जत्रा’‘बायोस्कोप’,‘माध्यमगड’ अशा संकल्पना घेऊन माध्यम महोत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही 'पुस्तकोत्सव' या संकल्पनेवर आधारीत आहे. 15,16 आणि 17 डिसेंबरला सकाळी 10ते 6 यावेळेत हा पुस्तकोत्सव भरवण्यात आलाय. या महोत्सवाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना ज्येष्ठ साहित्यक रत्नाकर मतकरी यांच्याशी संवाद साधता येणार आहे. 'करर्म इन्फ्रास्ट्रॅक्टर' हे या पुस्तकोत्सवाचे मुख्य प्रायोजक आहेत. पुस्तकोत्सवाच्या निमित्तानं नामवंत प्रकाशकांना पुस्तक विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात मेहता, प्रसाद, प्रथम, डायमंड, मनोविकास, परममित्र आणि टार्गेट यासारख्या प्रकाशकांचा समावेश आहे.
पुस्तकोत्सवाच्या निमित्तानं चर्चासत्र, व्याख्यान अशा दर्जेदार कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय. तसेच विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धांचेही आयोजन केलं गेलेय.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा