स्वत:च तयार करा लो कॅलरी जेवण

  मुंबई  -  

  सांताक्रुझ - लोण्यासोबत टोस्ट, भु्र्जी, मशरुम सॉस, चीज, केक, चॉकलेट चिप्स, आईस्क्रिम अशा पदार्थांना बघून कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही. पण, काही शाकाहारी या सर्व पदार्थांमध्ये दूध आणि मांसांचं मिश्रण वापरतात म्हणून खात नाहीत. पण, तुम्हाला हे सर्व पदार्थ दूध, मांस आणि अंड्याचं मिश्रण न घालता खाता आले तर. विश्वास बसत नाहीना. या अविश्वसनीय गोष्टीला खरं करुन दाखवलंय वेगन कुकिंग वर्कशॉपच्या शेफ विनिता कांट्रेक्टर यांनी. शाकाहारी जेवणात सगळ्यात महत्त्वाचं आणि कठीण काम म्हणजे योग्य मिश्रण आणि त्याचा वापर.

  पनीर, छास आणि केक या पदार्थांमध्ये दूध हे वापरलं जात. पण, दूध, मांस आणि अंड हे पदार्थ न वापरता चविष्ट पदार्थ बनवणं हे कौशल्यच आहे. वेगन कुकींगमध्ये पदार्थ बनवण्यासाठी लागणारं साहित्यही मिळतं. त्यामुळे पदार्थ चवदार बनवू शकतो असं मत विनिता यांनी मांडलं. तर, वर्कशॉपमध्ये अनेक खवय्ये हजेरी लावतात. वेगन कुकींगमध्ये येऊन पदार्थ खाण्यासाठी 2300 रुपये एवढं शुल्क आकारलं जातं. त्यामुळे खवय्येही खूश असतात. शाकाहारी जेवण तसं तर कॅलरीने भरलेलं असतं. त्यामुळे खाताना आपण विचार करतो. पण, वेगन कुकींगमध्ये बनवलेले पदार्थ खाण्याच्या दृष्टीने पौष्टिक आणि लो कॅलरी असतात. त्यामुळे तुम्हाला वजन वाढेल याचीही काळजी करायची गरज नाही.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.