Advertisement

मुंबईतील वॅक्स म्युझियमला भेट द्याच !


मुंबईतील वॅक्स म्युझियमला भेट द्याच !
SHARES

मादाम तुसा हे लंडनमधलं एक संग्रहालय आहे जिथं जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे उभारण्यात आले आहेत. फक्त मेणाचे पुतळे बघायला सर्वांना लंडनला जाणं शक्य नाही. असंच एक संग्रहालय लोणावळ्यातदेखील उभारण्यात आलं आहे. इथं जाणं शक्य असलं तरी दोन-तीन तास जातातच. पण आता मुंबईत तुम्हाला अशा संग्रहालयाला भेट देता आली तर? मुंबईत असं कुठलं संग्रहालय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आम्ही तुमची अशाच एका संग्रहालयाची ओळख करून देणार आहोत.


रेड कार्पेट वॅक्स म्युझियम

घाटकोपरमध्ये रेड कार्पेट वॅक्स म्युझियम उभारण्यात आलं आहे. इथं कलाकार, राजकारणी, खेळाडू, असे अनेकांचे मेणाचे पुतळे आहेत. महात्मा गांधी, बाळासाहेब ठाकरे, रामदास आठवले, अण्णा हजारे यांचे मेणाचे पुतळे तुम्हाला इथं पाहायला मिळतील. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, अब्राहिम लिंकन, दलाई लामा, नेल्सन मंडेला, आइन्सटाईन या आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्वांसोबत तुम्हाला फोटो काढण्याची संधी मिळणार आहे.



याशिवाय हॅरी पॉटर, मायकल जॅक्सन, गंगनम स्टाईल स्टारर साय (PSY) अँजलीना जोली, ब्रॅड पीट, ब्रुस ली, जेम्स बाँड हे कलाकार देखील तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत. जर तुम्ही फुटबॉल आणि मेसीचे चाहते असाल तर त्याच्यासोबत फोटो काढण्याची संधी तुम्ही सोडू नका. त्याच्यासोबत म्हणजे त्याच्या पुतळ्यासोबत. फक्त एवढंच नाही तर जॉन सीना, सायना नेहवाल या खेळाडूंचे मेणाचे पुतळे देखील आहेत. प्रथमदर्शी यांना पाहून वाटणारच नाही की इथले पुतळे खूप खरे अाहेत. 



फक्त बॉलिवूड सेलिब्रिटींना तुम्ही इथं नक्कीच मिस कराल. पण या व्यतिरिक्त आणखी अनेक आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला इथं पहायला मिळतील.



वॅक्स हँड

तुम्हाला जर स्वत:चा वॅक्स हँड बनवून घ्यायचा असेल तर तो देखील पर्याय इथं आहे. वॅक्स लिक्विडमध्ये तुमचा हात बुडवला जाईल. त्यानंतर पुढे वॅक्स हँड बनवण्याची प्रोसेस केली जाईल.


सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुमचा वॅक्स हँड तयार होईल. हा वॅक्स हँड तुम्ही घरात शो पिस म्हणून ठेवू शकता. यासाठी तुम्हाला २५० रुपये मोजावे लागतील.



कुठे :     आर. सिटी मल, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई
तिकिट : सोमवार ते शुक्रवार ३०० रुपये
            शनिवार-रविवार ४०० रुपये



हेही वाचा

मनोरीमधील 'हे' म्युझियम करतंय सांस्कृतिक वारसाचं जतन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा