• मनोरीमधील 'हे' म्युझियम करतंय सांस्कृतिक वारसाचं जतन
  • मनोरीमधील 'हे' म्युझियम करतंय सांस्कृतिक वारसाचं जतन
  • मनोरीमधील 'हे' म्युझियम करतंय सांस्कृतिक वारसाचं जतन
  • मनोरीमधील 'हे' म्युझियम करतंय सांस्कृतिक वारसाचं जतन
  • मनोरीमधील 'हे' म्युझियम करतंय सांस्कृतिक वारसाचं जतन
SHARE

बाबाआजमच्या काळातील जुन्यापुराण्या वस्तू टाकून देण्याची जागा म्हणजे वस्तूसंग्राहलय असं आपण समजतो. पण तरीही आपल्यापैकी काही जणांच्या प्रयत्नांनी आज मुंबईत अप्रतिम म्युझियम उभारण्यात आली अाहेत. त्यापैकीच एक म्युझियम म्हणजे मोबाई भवन. गेल्या अनेक वर्षांपासून हे म्युझियम इतिहास संवर्धनाचं आणि सांस्कृतिक ज्ञानदानाचं कार्य अविरतपणे करीत आहे.पुरातन वस्तूंचा खजिना

मुंबईतल्या ईस्ट इंडियन रहिवाशांच्या संस्कृतीवर आधारित असं हे शहरातलं सर्वात पहिलं म्युझियम आहे. यामध्ये विविध पुरातन वस्तूंचं जतन करण्यात आलं आहे. तांदूळ दळण्यासाठी वापरण्यात येणारं दगडाचं जातं, पाटा-वरवंटा,  मातीची भांडी, वेगवेगळी वाद्य, वेगवेगळ्या मूर्ती आदी गोष्टी इथं पहायला मिळत आहेत. 


याशिवाय पारंपारीक ईस्ट इंडियन रहिवाशांचे दागिने, पोशाख आणि लग्नाच्या वैदिक पद्धती या फोटोंचं प्रदर्शन देखील भरवण्यात आलं आहे. तुम्हाला इथं कोळी बांधवांचा आणि मुंबईचा इतिहास अधोरेखित करणारे काही दस्तावेज देखील पहायला मिळतील. 

 


खवय्यांसाठीही पर्वणी

तुम्ही उत्तम खवय्ये असाल तर या म्युझियमजवळील घरांमध्ये चुलीवर तयार केलेले अस्सल ईस्ट इंडियन खाद्य पदार्थांची चव तुम्हाला चाखता येईल. पारंपारीक पेहराव केलेल्या महिला तुम्हाला इथं जेवणं सर्व्ह करतील. जवळच मनोरी समुद्र किनारा असल्यानं तुम्हाला थोडे निवांत क्षण अनुभवता येतील

म्युझियम 

तुम्हाला देखील ईस्ट इंडियन संस्कृतीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर एकदा या म्युझियमला नक्की भेट द्या. या म्युझिममध्ये कुठल्याही प्रकारची प्रवेश फी आकारली जात नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जाऊ शकता. जेणेकरून मुलांना मुंबईचा इतिहास समजेल.  कुठे : मोबाई भवन, मनोरी-गोराई रोड, मनोरी, मालाड (प.)
वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजजेपर्यंतहेही वाचा

मुंबईचे गांधीतीर्थ म्हणजे 'मणिभवन'!
संबंधित विषय
ताज्या बातम्या