चित्रातून साकारली कर्जतची जीवनशैली

 Worli
चित्रातून साकारली कर्जतची जीवनशैली
Worli, Mumbai  -  

वरळी - वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये चित्रकार मनोज देशमुख यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. 31 जानेवारीपासून 6 फेब्रुवारीपर्यंत भरवण्यात आलं आहे. हे चित्र प्रदर्शन विनामूल्य असून सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत खुले राहणार आहे.

 

                                                                             या प्रदर्शनात ठेवण्यात आलेली चित्रं कर्जतच्या ग्रामीण भागातील जीवन शैलीवर आधारित आहेत. या प्रदर्शनात 27 चित्रांचा समावेश असून 7 हजार ते 52 हजार रुपये अशा या चित्रांच्या किंमती आहेत.

 

                                                                                            प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळी चित्रं रेखाटण्यात आली आहेत. मासे पकडणारा कोळी, बैल गाडीच्या शर्यती, गावातील लांब आणि भव्य पारंब्या असलेलं वडाचं झाड अशी अनेक वेगवेगळी चित्रे पाहिली तर कर्जतच्या ग्रामीण भागात फेरफटका मारून आल्याचा आनंद मिळतो. मनोज देशमुख यांनी या चित्रांच्या माध्यमातून लुप्त होत चालली ग्रामीण जीवनशैली आणि सौंदर्य रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.

Loading Comments