मुंबईच्या सक्षम सायक्लोथॉनमध्ये सहभाग घ्यायचाय? मग हे वाचा!

पेट्रोलियम उत्पादनांच्या संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी किमान आठवड्यातून दोन दिवस सायकलचा वापर करावा, यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन तर्फे 'सक्षम सायक्लोथॉन' या सायकल रॅलीचं आयोजन केलं आहे.#MainHoonSaksham अशी या रॅलीची टॅगलाईन आहे.

  • मुंबईच्या सक्षम सायक्लोथॉनमध्ये सहभाग घ्यायचाय? मग हे वाचा!
SHARE

'इंधनाची बचत करा' असं सांगणारी जाहिरात तुम्ही पाहिली आहे का? ज्यात मुलगा आपल्या वडिलांना सांगतो की, मी मोठा झालो की सायकलचा बिझनेस करणार! वडिल त्याला कारण विचारतात, तेव्हा तो सांगतो की, तुम्ही ज्या प्रकारे इंधन वाया घालवत आहात, त्यामुळे भविष्यात पेट्रोल किंवा डिझेल काहीच उरणार नाही. मग सर्व सायकलच वापरणार ना? खरंच त्याचा मुद्दा अगदी योग्य आहे. आपण जर असंच इंधन वाया घालवत राहिलो, तर एकदिवस इंधन संपून जाईल. पण अजूनही वेळ गेलेली नाही. परिस्थिती आपल्या हातात आहे. नेमका हाच संदेश देण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे 'सक्षम सायक्लोथॉन' या सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
मैं हूँ सक्षम!

पेट्रोलियम उत्पादनांच्या संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी किमान आठवड्यातून दोन दिवस सायकलचा वापर करावा, यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन तर्फे 'सक्षम सायक्लोथॉन' या सायकल रॅलीचं आयोजन केलं आहे.#MainHoonSaksham अशी या रॅलीची टॅगलाईन आहे.कुठे आहे रॅली?

रविवार म्हणजे २५ फेब्रुवारीला या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. मरीन ड्राइव्ह इथल्या पी. जे. हिंदू जिमखान्याच्या मैदानात स्पर्धकांनी सकाळी ५ वाजता एकत्र जमायचं आहे.यामध्ये अॅमेच्युअर्ससाठी २८ किलोमीटरच्या दोन रॅली आणि ८ किलोमीटरची एक ग्रीन राईड रॅली असणार आहे. तुम्ही यापैकी कुठल्याही रॅलीसाठी नोंदणी करू शकता.
कशी करणार नोंदणी?

यासाठी २१ फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे. goo.gl/KDd9Tj या लिंकवर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. अधिक माहितीसाठी www.sakshamcyclothon.com या त्यांच्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता.हेही वाचा

कधी पाहिली आहे का अशी रॅली?


संबंधित विषय
ताज्या बातम्या