सॅमसंग गॅलेक्सी ए 5, ए 7 भारतात लॉन्च

Mumbai
सॅमसंग गॅलेक्सी ए 5, ए 7 भारतात लॉन्च
सॅमसंग गॅलेक्सी ए 5, ए 7 भारतात लॉन्च
सॅमसंग गॅलेक्सी ए 5, ए 7 भारतात लॉन्च
See all
मुंबई  -  

मुंबई - सॅमसंग इंडियाने सॅमसंग गॅलेक्सी ए सिरीजमधील दोन नवीन मोबाइल भारतात लॉन्च केले आहेत. यामध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए 5 आणि सॅमसंग गॅलेक्सी ए 7 या दोन मोबाइलचा समावेश आहे. परळ येथील पॅलॅडियम मॉलमध्ये सॅमसंग इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष असीम वारीस यांच्या हस्ते हे फोन लॉन्च करण्यात आले. सॅमसंगने 2016 मध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए सिरीज सुरू केली होती. ती यशस्वी ठरल्यानंतर सॅमसंगने सॅमसंग गॅलेक्सी ए 5 आणि ए 7 हे दोन नवीन दमदार मोबाइल बाजारात आणले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी ए 5 आणि ए 7 मोबाइल ब्लॅक स्काय आणि गोल्ड या दोन रंगात ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. सॅमसंग गॅलेक्सी ए 7 ची किंमत 33,490 रुपये, तर ए 5 ची किंमत 28,990 इतकी आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.