मावरा, चिंबोरी आणि कोळीनृत्याची धमाल...

Juhu, Mumbai  -  

जुहू - कोळंबी भात, कोळंबी रस्सा, चिंबोरी म्हणजेच खेकड्यापासून बनवलेले अनेक प्रकार, माशाचं कालवण, पापलेट, हलवा, जवला, मच्छी करी.. आहाहा. तोंडाला पाणी सुटलं. या मेजवानीचा आस्वाद घ्यायला मिळाला जूहु कोळीवाडा येथे आयोजित केलेल्या सी फुड फेस्टिव्हलमध्ये. जुहूत आयोजित केलेल्या दोन दिवसीय फेस्टिव्हलचं यंदा पहिलं वर्ष होतं. फेस्टिव्हलमध्ये विविध सागरी माश्यांपासून बनवलेल्या पदार्थांचे 25 स्टॉल्स होते. या फेस्टिव्हलसाठी स्थानिकांनी कोळी पेहराव करत खवय्यांचं स्वागत केलं. खाण्यासोबत ऑर्केस्ट्रा, कोळी नृत्यप्रकारही सादर करण्यात आले. खाद्य प्रेमींसाठी हा फेस्टिव्हल धमाल ठरला हे नक्की. मात्र त्याचबरोबर पारंपारिक कोळी संस्कृतीचं आगळं-वेगळं दर्शनही इथे झालं.

Loading Comments