Advertisement

मुंबईतल्या 'या' कॉलेजेसमध्ये फेस्ट मूड ऑन


मुंबईतल्या 'या' कॉलेजेसमध्ये फेस्ट मूड ऑन
SHARES

कॉलेज लाइफ म्हणजे फुल टू धम्माल. नेहमीच उत्साही आणि चैतन्यमय असं वातावरण कॉलेजमध्ये पाहायला मिळतं. कॉलेजचे दिवस कोणत्या सोनेरी क्षणापेक्षा कमी नसतात. तरुणांच्या व्यक्तीमत्व विकासामध्ये अभ्यासाबरोबरच अभ्यासायेत्तर उपक्रमांचा मोठा सहभाग असतो. नृत्य, नाट्य, अभिनय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तरुणाईला घडवतात. कॉलेज इव्हेंट्स, गॅदरिंग, डान्स क्लब, ट्रेकिंग म्हणजे कॉलेज जीवनाचा आत्मा. जिथे इनोव्हेटिव्ह माईंड्स एकत्र येतात, अशा कॉलेज फेस्टची तर तरुणाई आतुरतेने वाट पाहत असते

डिसेंबर महिना सुरू झाला की, कॉलेज तरुणाईला फेस्टिव्हल्यसचे वेध लागतात. प्रोजेक्ट सबमिशन, कंटाळवाणा अभ्यास या सगळ्यातून कधी एकदा निवांतपणा मिळतो आणि मनसोक्त धमाल, मजा-मस्ती करायला मिळते.  फेस्टिव्हल्सच्याच माध्यमातून तरुणांना स्वत:ला सिद्ध करण्याची आणि काही तरी वेगळं करून दाखवण्याची संधी मिळते. त्यांच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होतं.मुंबईतल्या कॉलेजेसमध्ये देखील सध्या उत्साही आणि आनंदी वातावरण पाहायला मिळत असेल. कारण कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या फेस्टिव्हलला सुरुवात झाली असेल. तुम्ही विद्यार्थी आहात मग या कॉलेजेसमधल्या फेस्टमध्ये सहभागी होऊ शकता


प्रतिबिंब

इंजिनीअरिंग कॉलेजचं फेस्टिव्हल म्हणजे टेक्निकल इव्हेंट्सच डोळ्यासमोर येतात. पणव्हीजेटीआय कॉलेजनं या प्रतिमेला छेद देत स्वत:चंच एक वेगळं 'प्रतिबिंबनिर्माण केलं आहे. 'प्रतिबिंबहा व्हीजेटीआयचा फेस्टीवल आहे. डिसेंबर महिन्यात हा फेस्टीवल चांगलाच रंगतो.  



लाईट, कॅमेराअॅक्शन ही यावर्षीच्या फेस्टीवलची थीम आहे. तरुणांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक हटके इव्हेंट्सही या वेळी आयोजित करण्यात आले आहेत. फॅशन शो, फ्रेशेफेस ऑफ द इयर, मिस आणि मिस्टर व्हीजेटीआय असे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पथनाट्य, नृत्याविष्कार, वकृत्व असे एकापेक्षा एक सरस इव्हेंट्स आयोजित करण्यात आले आहेत. कला, कल्पकता ही प्रत्येकांमध्ये दडलेली असते. तरुणांमधल्या याच कलागुणांना व्हीजेटीआय प्रोत्साहन देते. 


कधी -२१ डिसेंबरपासून

 

२) वी आर द वर्ल्ड

कॉलेज फेस्टिव्हलमध्ये आपला हटकेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न प्रत्येक कॉलेजकडून केला जातो. तसाच प्रयत्न एच.आर.कॉलेजकडूनही करण्यात आला आहे. 'वी आर द वर्ल्ड 'असं त्यांच्या फेस्टिव्हलचं नाव आहे



वेगवेगळे इव्हेंट्स या फेस्टिव्हलमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईतल्या अनेक शाळांमधली मुलं या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत. जवळपास ४००० लोकं या फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी सहभागी होतात. तसंच सेलिब्रिटी देखील या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होतात.    


कधी - ३० नोव्हेंबर

कुठे - सेट.स्टॅनिसलॉस हायस्कूलवांद्रे


३) व्हिजन

सायनमधल्या एसआयइस कॉलेजमधील 'व्हिजन' फेस्टिव्हलची तरूणांमध्ये प्रचंड क्रेज आहे. 'फ्युजन' अशी या यावर्षीच्या फेस्टिव्हलची थीम आहे. सर्वांपेक्षा काही वेगळं करणं हे एसआयइस कॉलेजची खासियत आहे. यावर्षी व्हिजन स्वत:चा एक म्युजिकल बँड लाँच करणार आहे. 'थंडरस्ट्रोम' असं या बँडचं नाव आहे.



व्हिजन गॉट टॅलेंट, हॉस्टेज हायजॅक, रिंक फुटबॉल हे गेल्यावर्षीचे इव्हेंट यावर्षी देखील आयोजित केले आहेत. तर यावर्षी 'सुसाईड चेसआणि 'रन बेबी रन'सारखे इव्हेंट देखील आयोजित केले आहेत


कधी -१२ डिसेंबरपासून

कुठे - कामा क्लबलोअर परेल

 

४) डिटूर फेस्टिव्हल

जयहिंद कॉलेजच्या 'डिटूर' या फेस्टिव्हलला देखील तरूणांची चांगली पसंती असते. मास मीडिया विभागातर्फे या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. 'लेजंड' ही जयहिंद कॉलेजची यावर्षीची थीम आहे.  



मुंबईतील ३० कॉलेजेसमधून अंदाजे २५०० ते ३००० विद्यार्थी या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होतात. यासोबतच साजिद खान, जॉन अब्राहिम, इमरान खान, नील नितीन मुकेश, नंदिता दास आणि शान असे सेलिब्रिटी देखील हजेरी लावतात.


कधी -३१ डिसेंबरपासून


मूड इंडिगो

धम्माल, मस्ती बरोबरच तंत्रज्ञानातील गंमतीजंमती अनुभवण्याची संधी देणाऱ्या आयआयटीचा 'मूड इंडिगो' हा फेस्टिव्हल तरूणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. 'मूड आय' या नावानं देखील हा फेस्टिव्हल ओळखला जातो. 'ला फे कार्निव्हल' ही यंदाची मूड इंडिगोची थीम आहे. मुंबईच्या पवई इथल्या विस्तीर्ण कॅम्पसमध्ये २२ ते २५ डिसेंबर दरम्यान हा फेस्ट रंगणार आहे


    

भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन दरवर्षी 'मूड इंडिगो'मध्ये होत असते. नाट्यकला, ललित कला, साहित्य कला, संगीत, नृत्य, वकृत्व अशा विविध विषयांवर 'मूड इंडिगो'मध्ये कार्यशाळा भरणार आहे. धमाल मस्ती आणि स्पर्धांसोबत मूड इंडिगोत सामाजिक भान देखील जपले जाते. चार दशकाहून अधिक काळ या फेस्टनं देशभरातील विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य केलं आहे. यंदा मूड इंडिगोचे ४७वे वर्ष आहे. देशभरातील दीड हजार कॉलेजांमधील सुमारे एक लाखांहून अधिक विद्यार्थी या महोत्सवाला भेट देणार आहेत.


कधी २२ ते २५ डिसेंबर

कुठे - आयआयटी कॅम्पस, पवई



हेही वाचा

केरळच्या हाऊसबोटची मजा अनुभवा आता मुंबईत!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा