वांद्र्यात विविध नृत्यशैलींचा अविष्कार

Pali Hill, Mumbai  -  

वांद्रे - बॉलिवुड, जॅझ, फ्रीस्टाइल, बॅले, कथ्थक अशा भारतातील आणि परदेशातील विविध नृत्यशैलींचा अविष्कार पहायला मिळाला वांद्रेतील सेंट अॅंड्र्यूज ऑडोटोरियममध्ये... निमित्त होतं एसएनडीए, म्हणजे सुमित नागदेव डान्स अँड आर्ट्स अकादमीच्या विद्यार्थ्यांच्या 10 व्या वार्षिक हिवाळी स्नेहसंमेलनाचं.

संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे फ्रान्स, इटली, अमेरिका, रशिया हंगेरी या देशांतले विद्यार्थीही या स्नेहसंमेलनात सहभागी झाले होते. भारतातून अहमदाबाद, मेरठ, जयपूर, आसाम आणि मुंबईचे कलाकार-विद्यार्थी या स्नेहसंमेलनात सहभागी झाले. स्वॅन लेक एक्सपर्ट्स, सर्कल ऑफ लाइफ, फ्रोझन म्युझिकल, कलर्स ऑफ लव्ह आणि ट्रीब्युट टू इंडियन आर्मी अशा अनेक संकल्पनांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली. या नृत्यांत सहभागी झालेले कलाकार 3 ते 35 वयोगटातले होते.

Loading Comments