Advertisement

निसर्गप्रेमींनो भंडारदराला भेट द्याच!


निसर्गप्रेमींनो भंडारदराला भेट द्याच!
SHARES

एक साधी, छोटी सहल ज्यातून आनंद मिळेल आणि रोजच्या त्या रटाळ कामातून थोडा चेंज मिळावा म्हणून एखादा दिवस पिकनिकला जायला सर्वांनाच आवडेल. असंच एक नयनरम्य स्थळ म्हणजे 'भंडारदरा'. प्रवासाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत निसर्गाचे मनोहरी रूप भंडारदरात पहायला मिळते

निसर्गाची बदलती रुपं अगदीच जवळून पहायची असेल तर सह्याद्री डोंगरदऱ्यांच्या कुशीत गेलंच पाहिजे. सभोवताली फक्त आणि फक्त निसर्ग आहे, कानांमध्ये वाऱ्याची झुळूक, हवेत गारवा आणि प्रवाहाच्या दिशेनं जाणारे ढग पाहताना गंमत वाटते. मन सैरावैरा पळत असेल तर नक्कीच अशा निसर्गाच्या सान्निध्यात शांत होईल. मुंबईहून अवघ्या काही अंतरांवर वसलेल्या भंडारदरातील वातावरण तुमचं मन प्रसन्न करेल


चला मग जाऊ भंडारदराला

शू ड्रिल एडवँचर म्हणजेच एसडीए या ग्रुपनं निसर्गप्रेमींसाठी ३ ते ४ नोव्हेंबरला भंडारदरात एका कँपेनचं आयोजन केलं आहे. यासाठी तुम्हाला १४५० रुपये मोजावे लागतील. यामध्ये तुम्हाला चहा, रात्रीचं जेवण आणि दुसऱ्या दिवशीचा सकाळचा नाष्टा मिळेल. यासाठी तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी https://goo.gl/THmy4q या लिंकवर क्लिक करा. अधिक माहितीसाठी 9028278502 या नंबरवर संपर्क करू शकता.


काय कॅरी कराल?

  • ३ लिटर पाण्याची बॉटल
  • बिस्किट, वेफर्स वैगरे
  • टॉर्च आणि अधिक बॅटरी
  • मेडिसिन
  • कॅमेरा
  • चांगल्या प्रतिचे ट्रेकिंग शूज


भंडारदरा आहे कुठे ?

निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले गाव भंडारदरा. हे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात. भंडारदरा-शेंडी हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले एक आदिवासी कोळी महादेव जमातीचं गाव. पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा आहेत

इथं पाहण्यासाठी कळसुबाई मंदिर, पांजरे बेट, अलंग, मलंग, कुलंग गड, उंबरदारा व्ह्युव पॉइंट, कोकणकडा, घाटनदेवी व्ह्युव पॉइंट, सांदन दरी, रिव्हर्स वॉटर फॉल, अमृतेश्वर मंदिर, नान्ही वॉटर फॉल, विल्सन डॅम, कळसुबाई शिखर, रत्नागड, रंधा फॉल, रतनवाडी, घाटघर असे पर्याय आहेतच. तेथील गावकऱ्याला तुमचा गाईड म्हणून घेऊ शकता. त्यांच्याकडे वनपरीक्षेत्र वन्यजीव भंडारदरा कार्यालयाचे गाईड ओळखपत्र पहावे

कधी : ३ नोव्हेंबर संध्याकाळी ५ वाजता आणि ४ नोव्हेंबर सकाळी १० वाजता

भेटायचं स्थळ : दादर पश्चिम रेल्वे तिकिटहेही वाचा

होऊन जाऊ दे सायकलस्वारी

आता करा मुंबई ते गोवा क्रूझनं सफर
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा