स्मार्टफोनचे 'स्मार्ट' कव्हर !

 Pali Hill
स्मार्टफोनचे 'स्मार्ट' कव्हर !
स्मार्टफोनचे 'स्मार्ट' कव्हर !
स्मार्टफोनचे 'स्मार्ट' कव्हर !
स्मार्टफोनचे 'स्मार्ट' कव्हर !
स्मार्टफोनचे 'स्मार्ट' कव्हर !
See all
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - तंत्रज्ञानातील बदलांबरोबर दर महिन्याला नवनवीन स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल होत असतात. या स्मार्टफोनसाठी इतरांपेक्षा हटके स्मार्ट कव्हर निवडण्याकडे मोबाईल युझर्सचा कल असतो. ही बाब विचारात घेऊन विविध प्रकारचे प्रिंटेड कव्हर्स बाजारात उपलब्ध झालेले दिसून येत आहेत.

स्पायडर मॅन, सुपर मॅन असे हिरो तर केव्हिन आणि ग्रीन मॅन कार्टूनच्या प्रिंटेड कव्हर्सला बाजारात मोठी मागणी आहे. ताजमहाल आणि आयफेल टॉवर यासारख्या ऐतिहासिक वास्तू सुद्धा मोबाईल कव्हरवर दिसून येतात. तसेच छत्रपती शिवाजी महराजांचे चित्र देखील कव्हरवर उपलब्ध आहे.

फुलपाखरू, हार्ट, फुलांची चित्रे, बार्बी डॉल, मोर आणि अमेरिकन डायंमड असलेले कव्हर अशा नावीन्यपूर्ण मोबाईल कव्हर्सला मुलींकडून मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येते. बाहुबलीसारख्या सिनेमाचे देखील कव्हर बाजारात उपलब्ध आहे. सर्व प्रिंटेड मोबाईल कव्हरच्या किमती १०० रुपयापासून ते २५० रुपयापर्यंत असल्याने स्मार्टफोनधारक या कव्हरमधून आपल्या स्मार्ट फोनला अधिक स्मार्ट लूक देत आहेत.

Loading Comments