SHARE

मालाड - भटक्या भारतीय वंशाच्या श्वान आणि मांजरांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्राणीमित्र वर्ल्ड फॉर ऑल या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतलाय. या संस्थेने मालाड पश्चिमेकडील हायपरसिटी मॉलमध्ये प्राण्यांना दत्तक घेण्याचा उपक्रम हाती घेतला. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी आयोजित या उपक्रमात आतापर्यंत 4 भटक्या श्वानांना श्वानप्रेमींनी दत्तक घेतलंय. या प्राण्यांचे वैद्यकीय तपासणी, लसीकरण ही करण्यात आले आहे.

"श्वानप्रेमी हे विदेशी प्राणी पाळतात. भारतीय वंशाचे प्राणी देखील त्यांच्या इतके चांगले असतात. हे प्राणीप्रेमींच्या मनात बिंबवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे दोन दिवसीय दत्तक उपक्रम हाती घेतला," असे वर्ल्ड फॉर ऑल संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष तरोनिश बलसरा यांनी सांगितले. "या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून अनेकांनी आमच्याकडे भटके प्राणी दत्तक घेण्याविषयी विचारणा केली असे," बलसारा यांनी म्हटले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या