• रंगात रंगूनी साऱ्या, रंग माझा वेगळा
  • रंगात रंगूनी साऱ्या, रंग माझा वेगळा
SHARE

रंगाशिवाय काहीच मजा नाही. हे रंग जर नसते तर? कल्पना करा आपलं आयुष्य ब्लॅक अँड व्हाईट झालं असतं. एखाद्या जुन्या चित्रपटात दिसायचं अगदी तसंच. या रंगाशिवाय राहण्याची कल्पनाच करवत नाही ना? प्रत्येक रंगाविषयी आपल्या सर्वांच्याच मनात काहिना काही आकर्षण असतं. असचं एक आकर्षण मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे. मुंबईकरांच्या आयुष्यात रंग भरण्यासाठीच तर ‘द कलर रन’ मुंबईत येत आहे. 'द कलर रन' असा इव्हेंट आहे जो पहिल्यांदाच भारतात होत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या टुअरची सुरुवात मुंबईतून होणार आहे.    नक्की काय आहे 'द कलर रन'?

आत्तापर्यंत आपण अनेक मॅरेथॉन पाहिल्या असतील. पण 'द कलर रन'ची बातच काही और! ५ किलोमीटर आयोजित या रनमध्ये ३५ देशांमधून जवळपास ६ कोटीहून अधिक रनर यात सहभागी होणार आहेत. प्रत्येक किलोमीटर पार करत असताना तुम्ही वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघाल. या रनसाठी वेळेची अट नाही. पण या रनमध्ये एक आहे ती म्हणजे कपड्यांबद्दल. या रनमध्ये पांढरे कपडे घालूनच स्पर्धक सहभागी होतात. पण एक मात्र खरं रनच्या शेवटी तुम्ही गुलाबी, निळ्या, पिवळ्या अशा रंगात रंगलेले असाल.


 

'द कलर रन'मागचा उद्देश

भारतात पहिल्यांदाच असा कलरफुल इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. वेगवेगळ्या देशातील लोकांना एकाच छताखाली आणणे हा या इव्हेंटचा हेतू आहे. याशिवाय आरोग्य आणि त्यासोबतच आनंद हा या कलरफुल इव्हेंटचा उद्देश आहे. फक्त एवढेच नाही तर एक निरोगी आयुष्य जगण्यासाठी देखील ‘द 5K इव्हेंट’ प्रोत्साहन देतो.  


कुठे आणि कधी?

तुम्हाला देखील वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगायचं आहे? मग १४ जानेवारीला बीकेसी इथं रंगणाऱ्या कलरफुल इव्हेंटचा भाग व्हा.


संबंधित विषय
ताज्या बातम्या