Advertisement

फिफा वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रवासाची रंजक कहाणी


फिफा वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रवासाची रंजक कहाणी
SHARES

फिफा वर्ल्डकपची क्रेझ जगभर पसरली आहे. जगात फुटबॉलच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. फिफाच्या मॅचेस जेवढ्या लोकप्रिय आहेत तेवढिच फिफा ट्रॉफी देखील आहे.

15 जुलैला म्हणजेच रविवारी देखील याच ट्रॉफीसाठी फ्रान्स आणि क्रॉएशिया हे दोन संघ आपापसात भिडले. क्रॉएशियावर  4-2 असा विजय मिळवत फ्रान्सनं फिफा वर्ल्डकप ट्रॉफिवर  स्वतःचं नाव कोरलं आहे. फिफा वर्ल्डकपच्या मॅचप्रमाणेच या ट्रॉफिचे देखील महत्त्व आहे. या ट्रॉफीविषयी काही रंजक गोष्टी आम्ही सांगणार आहोत ज्या तुम्ही पहिल्यांदाच वाचल्या असतील.


विजयाचे प्रतिक

 
फिफा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला ही ट्रॉफी देण्यात येते. आता या ट्रॉफीचे स्वरूप आधीपेक्षा वेगळे आहे. सुरुवातीला पहिल्या ट्रॉफीचे नाव व्हिक्टरी म्हणजेच विजय हे होते. मात्र ते बदलून त्याचे नाव फिफाचे चौथे माजी अध्यक्ष ज्युल्स  रिमेत यांच्यावरून ज्युल्स रिमेत कप असे ठेवले. 1946 मध्ये रिमेत यांना सन्मानित करण्यासाठी या ट्रॉफिचं नाव बदलण्यात आलं होतं. फ्रेंच शिल्पकार आबेल लफ्ल्यूर यांनी या ट्रॉफिचे डिझाईन केले होते. 1930 ते 1970 या कालावधीत याच नावानं ही ट्रॉफी देण्यात आली.
 

हिटलर आणि ट्रॉफी 


 1938 चा फिफा विश्वचषक विजेते इटसीनं आयोजित केला होता. तेव्हाचे फिफा उपाध्यक्ष ओटोरिसो बरासी यांनी हिटलरच्या भितीनं ट्रॉफी बेडमध्ये लपवून ठेवली होती.
 
 

तिनदा ट्रॉफीची चोरी 
 

जिंकलेला संघ पुढील तीन वर्षे ट्रॉफी स्वतःकडे ठेवत असे. पण 1966 साली फिफाची ट्रॉफी चोरण्यात आली होती. इग्लंडमधील स्पर्धेला चार महिने असताना ट्रॉफी वेस्टमिनस्टेर सेंट्रल मॉल इथून  चोरीला गेली. ट्रॉफीच्या बदल्यात 15 हजार पौंड रक्कम चोरांनी मागवली  होती. यासाठी पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली. त्यानंतर ही ट्रॉफी दक्षिण लंडनमधल्या डेव्ह कॉर्बेट यांचा कुत्रा पिक्लेसला सापडली. डेव्हला 6000 पौंड आणि पिक्लेसला जीवनभरसाठी खाद्य असे बक्षिस मिळाले
 
पुन्हा 1983 साली रियो दी जानरियोमधील ट्रॉफी चोरीला गेली. ती पुढे कधीच मिळाली नाही. त्यामुळे चोरांनी ती वितळवली असेल असा समज झाला.
 
2010 साली ट्रॉफी चोरण्याचा पुन्हा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी स्पेन आणि नेदरलँड यांच्यात अंतिम सामना सुरू होता. इथल्या सुरक्षा रक्षकांना लगेच चोराला पकडण्यात यश आले.


अशी बनवली ट्रॉफी 
 

10व्या फिफा वर्ल्डकप दरम्यान म्हणजेच 1974 मध्ये नवीन ट्रॉफी बनवण्यात आली. सात तज्ञांनी मिळून बनवलेल्या 53 डिझाईनमधून या ट्रॉफिच्या डिझाईनची निवड केली होती. आत्ताची ट्रॉफी इटलीतल्या सिल्व्हियो गॅज्निग यांनी डिझाईन केली आहे.
 
फिफाच्या ट्रॉफीवर जिंकणाऱ्या संघाचे नाव लिहले जाते. आता यावर फक्त 2038 पर्यंत वर्ल्डकपमधल्या विजेत्यांची नावं लिहण्यास जागा आहे.
 
आधी विजेता संघ पुढच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यापर्यंत ही ट्रॉफी स्वतःकडे ठेवत असे. आता यामध्ये बदल करण्यात आले आहेत. सोन्याचा मुलामा दिलेली कांस्य धातूची प्रतिकृती विजेत्या संघाला देण्यात येते. मूळ ट्रॉफी झूरिचमधील फिफा वर्ल्डकप म्युझियममध्ये आहे.  ही ट्रॉफी फक्त ट्रॉफी टूर, वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यासाठी वापरली जाते.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा