Advertisement

मुंबईत बच्चे कंपनीसाठी आयोजित विंडमिल फेस्टीव्हल


मुंबईत बच्चे कंपनीसाठी आयोजित विंडमिल फेस्टीव्हल
SHARES

विकेंडचा प्लॅन करताय? खास करून घरातल्या बच्चे कंपनीसाठी? तुमच्या मुलांसोबत तुम्हाला वेळ घालवायचा असेल तर मुंबईत आयोजित विंडमिल फेस्टिव्हल तुमच्यासाठीच आहे. मुंबईत पहिल्यांदाच विंडमिल फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे.



विंडमिल फेस्टिव्हल खास करून शहरी भागातील कुटुंबांसाठी आयोजित करण्यात येत आहे. मुंबईसारख्या शहरात आई-वडिल आपल्या मुलांना जास्त वेळ देऊ शकत नाहीत. या फेस्टिव्हलद्वारे तुम्ही तुमच्या मुलांसोबत वेळ घालवू शकता. या फेस्टिव्हल अंतर्गत तुम्ही तुमच्या मुलांसोबत मजा, मस्ती आणि बरंच काही करू शकता. मग या विकेंडला तुमच्या मुलांसोबत तुम्हाला लहान होण्याची संधीच विंडमिल फेस्टिव्हलच्या माध्यमातून मिळत आहे. मग या संधीचं सोनं करा. 



फेस्टिव्हलची खासियत

या महोत्सवात डांस, गाणी, मैदानी खेळ आणि मुलांसाठी कार्यशाळा अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमांअंतर्गत मुलं अधिक सर्जनशील बनतील. तसंच मुलांना अधिक माहिती आणि अनुभव या फेस्टिव्हलमुळे मिळेल. त्यामुळे हा फेस्टिव्हल बच्चे कंपनीसाठी फायदेशीर ठरेल. या फेस्टिव्हलमध्ये 0 ते 3, 4 ते 7 आणि 8 ते 14 वयोगटातील मुलं सहभागी होऊ शकतात. बीकेसीतल्या जीओ गार्डनमध्ये या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. 16 आणि 17 डिसेंबर असे दोन दिवस हा फेस्टिव्हल रंगणार आहे.



दोन दिवस आयोजित या फेस्टिव्हलमध्ये टीव्ही सेलिब्रिटी आणि गायक अर्जुन कानूनगो, दर्शन रावल, अक्का सिंह आणि भव्या पंडित देखील सहभागी होणार आहेत. फेस्टिव्हलमध्ये 15 वेगवेगळे स्टुडिओ उभारण्यात आले आहेत. या स्टुडिओजमध्ये रोबोटिक्सचे थेट प्रदर्शन होणार आहे. शिवाय मुलांना क्राफ्ट देखील शिकवण्यात येईल. ट्रेजर हंटमध्ये देखील कुटुंब सहभागी होऊ शकतं. ट्रेजर हंट अंतर्गत कुटुंबातील सर्व सदस्यांनी एक गुप्त खजिना शोधायचा असतो.



 तुम्हाला देखील आपल्या मुलांसोबत वेळ घालवायचा असेल तर नक्की या फेस्टिव्हलमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या मुलांसोबत मजा, मस्ती आणि धमाल करा. या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी बुक माय शोवर तिकीट बुक करू शकता.    



हेही वाचा

१६ डिसेंबरला उल्का वर्षाव पाहाण्याची मुंबईकरांना संधी!

शॉपिंगची क्रेझ आहे? मग मुंबईत येतोय महा शॉपिंग फेस्टिव्हल!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा