Advertisement

१६ डिसेंबरला उल्का वर्षाव पाहाण्याची मुंबईकरांना संधी!

१६ डिसेंबरच्या मध्यरात्री उल्का वर्षाव होणार आहे. जेमिनिड्स नावाचा प्रसिद्ध उल्का वर्षाव दरवर्षी डिसेंबरमध्ये होतो. यावर्षी देखील १६ डिसेंबरला उल्का वर्षाव होणार असून मुंबईकरांना हा उल्का वर्षाव पाहण्याची संधी मिळणार आहे.

१६ डिसेंबरला उल्का वर्षाव पाहाण्याची मुंबईकरांना संधी!
SHARES

रात्री आकाशात अचानक एक तारा सर्रर्रकन तुटताना दिसतो. कधी निळ्या-पांढऱ्या रंगाचा, तर कधी चक्क लाल-पिवळा! कधी एक निळसर हिरवी तर कधी पिवळसर-लालसर रेषा मागे सोडत पुढे जाताना दिसतो. पाहता पाहता तो अचानक लुप्तही होऊन जातो. अनके जण तुटणारा तारा दिसला, की पटकन डोळे बंद करतात आणि तोंडातल्या तोंडात काही तरी पुटपुटताना दिसतात. तारा तुटताना दिसला म्हणजे मनातल्या इच्छा पूर्ण होतात, अशी समजूत आहे. पण ही एक प्रकारची अंधश्रद्धाच म्हणावी लागेल.खगोल विश्वातल्या अनेक गोष्टी आजही आपल्या आकलनाच्या बाहेर आहेत. अशीच एक घटना १६ डिसेंबरच्या मध्यरात्री होणार आहे.१६ डिसेंबरच्या मध्यरात्री उल्का वर्षाव होणार आहे. जेमिनिड्स नावाचा प्रसिद्ध उल्का वर्षाव दरवर्षी डिसेंबरमध्ये होतो. यावर्षी देखील १६ डिसेंबरला उल्का वर्षाव होणार असून मुंबईकरांना हा उल्का वर्षाव पाहण्याची संधी मिळणार आहे.

ऑस्ट्रिच आणि स्पेस ग्रीक मुंबई या ग्रुपतर्फे उल्का वर्षाव पाहण्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यात तुम्हाला जेमिनिड मीटिअर शॉवर पाहता येणार आहेत. याअंतर्गत तुम्हाला एका तासात १२०-१६० उल्का वर्षाव पाहाण्याची संधी मिळणार आहे. यासाठी १,४९९ रूपये इतकी किंमत मोजावी लागेल. यासाठी तुम्हाला 'बुक माय शो'वर बुकिंग करावं लागेल. बुकिंग कन्फर्म झालं, तर तुम्हाला पनवेल स्टेशनवर जमायचं आहे. इथून पुढे इच्छित स्थळी नेण्याची जबाबदारी ऑस्ट्रिच आणि स्पेस ग्रीक मुंबई या ग्रुप्सची आहे. या कॅम्पमध्ये तुम्हाला उल्का वर्षावाबद्दल माहिती देण्यात येईल. तसंच, जेमिनिड मीटिअर शॉवर म्हणजे काय? याची माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे हौशी अभ्यासक आणि संशोधक मंडळींना याचा फायदा नक्कीच होईल!उल्का वर्षाव कसा पाहाल?

  • उल्का वर्षाव पाहाण्यासाठी टेलिस्कोपची गरज नाही
  • दुर्बिण घेतल्यास उत्तम
  • अधिक सुस्पष्ट दिसण्यासाठी उल्का वर्षाव मध्यरात्रीनंतरच पाहावा
  • मोकळ्या मैदानात जाऊन उल्का वर्षाव पाहावा


जेमिनिड मीटिअर शॉवर म्हणजे काय?

शास्त्रज्ञांनी काही ग्रह सूर्याच्या कक्षेत येण्याच्या आणि तेव्हाच पृथ्वीजवळून जाण्याच्या कालावधीचा अभ्यास करून उल्का वर्षावाच्या काही ठराविक तारखा ठरवल्या आहेत. एखाद्या वेळी खूप साऱ्या उल्का पडतात, तेव्हा उल्का वर्षाव झाला, असं म्हटलं जातं. यातही स्पर्डिक आणि मीटिअर शॉवर असे प्रकार आहेत. दोन-तीन उल्का जेव्हा एकट्या वेगवेगळ्या पडतात, तेव्हा त्यांना 'स्पर्डिक' म्हणतात. कधी कधी उल्का वर्षाव सतत काही दिवस आपण पाहू शकतो. उल्का ज्या तारकासमुहातून येत असतील, त्याच तारकासमूहाचं नाव उल्का वर्षावाला दिलं जातं. डिसेंबर महिन्यात जेमिनी नक्षत्रातून उल्का वर्षाव होतो, हे निश्चित असतं. म्हणून त्याला जेमिनिड मीटिअर शॉवर या नावानं ओळखलं जातं.हेही वाचा

13 कोटी वर्षांपूर्वी अंतराळात घडलेला 'गोल्ड रश'!


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा