प्यार किया तो डरना क्या...

 Bhiwandi ST Depot
प्यार किया तो डरना क्या...

भिवंडी - एका प्रियकराने भर रस्त्यात आपले प्रेम व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. नाराज झालेल्या आपल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी या तरुणाने तिच्या बोटात अंगठी घालत तिची माफी मागितली. त्यानंतर तिला कारमध्ये बसवत निघून गेला.


असं सांगितलं जात आहे की, व्हायरल झालेल्या या व्हिडिओत दिसणाऱ्या तरुण-तरुणीचा साखरपुडाही झाला आहे.

महाविद्यालयाच्या समोर संध्याकाळी कारमधून आलेल्या या प्रियकराने आपलं प्रेम जगजाहीर केलं. नाराज झालेल्या आणि बुरख्यामध्ये असलेल्या प्रेयसीला समजवण्याचा प्रयत्नही केला. या वेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे मोठी वाहतूककोंडीही झाली. पालकांसह घरी जाणारे विद्यार्थी हा नजारा पाहून चकित झाले. अशा प्रकारे एका तरुणाने आपलं प्रेम जाहीर करणं याबद्दल नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर त्या तरुणाने तिथे जमलेल्या नागरिकांना धमकी देण्याचा प्रयत्नही केल्याचं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

Loading Comments