Advertisement

मन शांती मिळवण्यासाठी सोशल मीडियापासून घ्या ब्रेक


मन शांती मिळवण्यासाठी सोशल मीडियापासून घ्या ब्रेक
SHARES

घड्याळ्याच्या काट्यावर आपण सर्व धावत आहोत. अर्धा दिवश प्रवासात आणि अर्धा दिवस ऑफिसमध्ये जातो. दोन-तीन तास मिळतात ते आपण मोबाइलमध्ये घालवतो आणि उरलेले झोपण्यात. त्यामुळे तसं बघायला गेलं तर मनाला शांती अशी मिळत नाही. मग एखादा ब्रेक मिळाला तर त्यातही आपण मोबाइल किंवा सिगारेट फुकण्यात वेळ दवडतो. तरी समाधान काही मिळत नाही. पण आम्ही तुम्हाला छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला तंत्रज्ञानापासून थोडं दूर राहावं लागेल. अगदीच मोबाइल, संगणक यापासून लांब राहण्याचा सल्ला नाही देत.

१) दिवसभरात कधीही मोबाइल किंवा संगणक यासारख्या डिव्हाईसपासून थोडा ब्रेक घ्या. या ब्रेकमध्ये तुम्ही पुस्तकं वाचा, पेपर वाचा किंवा मित्रांशी गप्पा मारा. नाहीत नुसते बसून राहा.

२) तीन ते चार दिवस फेसबुकपासून लांब राहा. फेसबुकपासून लांब राहिल्यानं मेंदू तणाव मुक्त होण्यास मदत होते.३) झोपताना आणि उठल्यावर आपण पहिला मोबाइल बघतो. त्यावेळी जे पाहतो ते विचार डोक्यात फिरत राहतात. त्यामुळेच निद्रानाशाची समस्या निर्माण होते.

४) मोबाइल आणि संगणकात डोकं खुपसल्यानंतर आपण आजूबाजूला पाहत देखील नाही. ऑफिसमध्ये पूर्ण वेळ तर आपण संगणकापासून लांब नाही राहू शकत. पण थोडा ब्रेक घेऊन बाहेर एक फेरफटका मारू शकतो. याशिवाय येता जाता कानात हेडफोन घालून बहिरे होण्यापेक्षा आजूबाजूच्या गोष्टींवर नजर ठेऊ शकतो.

५) सोशल मीडियापासून थोडा ब्रेक घेतल्यामुळे येणारा एकटेपणा, मत्सर, स्वत:ची दुसऱ्यासोबत तुलना करण्याची सवय यापासून लांब राहता येतं.हेही वाचा - 

'हे' ७ व्यायाम प्रकार तुमचं आयुष्य करतील सुखकर
संबंधित विषय
Advertisement