मुंबईतल्या या 10 ठिकाणी दिसतात फिल्मस्टार

Mumbai
मुंबईतल्या या 10 ठिकाणी दिसतात फिल्मस्टार
मुंबईतल्या या 10 ठिकाणी दिसतात फिल्मस्टार
मुंबईतल्या या 10 ठिकाणी दिसतात फिल्मस्टार
मुंबईतल्या या 10 ठिकाणी दिसतात फिल्मस्टार
मुंबईतल्या या 10 ठिकाणी दिसतात फिल्मस्टार
See all
मुंबई  -  

स्वप्नांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत अनेक जण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. यातील काहींची स्वप्नपूर्ती होते. तर काही जण त्या स्वप्नासाठी प्रयत्न करत असतात. या मुंबई शहरात एकीकडे मोठ-मोठे कारखाने, कार्यालये आहेत, तर दुसरीकडे बॉलिवूड जगतातले स्टार देखील याच मुंबई शहरात राहणे पसंत करतात. आमच्या तुमच्याप्रमाणे कधीकधी यांना देखील फेरफटका मारायला आवडते. अनेकदा या बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्रींची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासनतास रांग लावून उभे असतात. मुंबईत अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे हे फिल्मस्टार दिसतात. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जेथे तुम्हाला तुमचे लाडके फिल्मस्टार बघायला मिळतील.

1) मरीन ड्राईव्ह - मुंबईतले सर्वात महागडे ठिकण अशी मरीन ड्राईव्हची ओळख आहे. मोठमोठ्या नामांकित व्यक्ती, सिने तारका मरीन ड्राईव्हमध्ये राहतात. त्यामुळे अनेक सेलिब्रिटीज मॉर्निंग वॉकला या ठिकाणी येतात.  चित्रपटाच्या शूटिंगसाठी देखील हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

2)जुहू चौपाटी - जुहू चौपाटी, मुंबईतील पर्यटन स्थळांपेैकी एक. सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांचा बंगला देखील याच ठिकाणी आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जुहू हे ठिकाण मुंबईतल्या 10 सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. या ठिकाणी सिने जगतातील अनेक तारकांचे घर आहे. त्यामुळे अनेकदा ते जुहू बीचवर फेरफटका मारताना दिसतात.3) फिल्म सिटी - मुंबईच्या गोरेगावमधील फिल्म सिटी या ठिकाणी अनेक सिनेमे आणि मालिकांचे चित्रीकरण होत असते. येथे 20 स्टुडियो आहेत. चित्रपटाचे शूटिंग नसताना अनेक अभिनेते-अभिनेत्री या ठिकाणी फिरायला येतात.

4)छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) - मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस हे ऐतिहासिक रेल्वे स्टेशन आहे. ते मध्य रेल्वेचे मुख्य कार्यालय आहे. अनेक पर्यटकांसाठी हे ठिकाण सेल्फी पॉईंट बनले आहे. या ठिकाणी बॉलिवूड स्‍टार अधून-मधून फिरण्यासाठी येतात.

5) अक्सा बीच - मुंबईल्या प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असलेले मालाडमधील अक्सा बीच. अनेक तारे-तारका चित्रपटाच्या शूटिंगसाठी या ठिकाणी येत असतात. अभिनेता सलमान खानच्या 'तुझे अक्सा बीच घुमादू' या गाण्याचे चित्रीकरण याच ठिकाणी झाले आहे.6) वांद्रे - मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक. वांद्र्यातील बँडस्टँड, कार्टर रोड, पाली हिल, वांद्रे-वरळी-सी ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान हे दोन्ही अभिनेते वांद्र्यात राहतात. त्यामुळे ते बऱ्याचदा मॉर्निंग वॉकला जाताना तुम्हाला दिसतील.

7) कुलाबा कॉजवे - कुलाबा कॉजवे हे ठिकाण देखील चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला मुंबईचे 'कल्चर स्क्वायर' म्हटले जाते. येथे मोठमोठे हॉटेल आणि रेस्टॉरेंट तर आहेतच याशिवाय कुलाबातील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय या इमारती देखील प्रसिद्ध आहेत.

8) गेटवे ऑफ इंडिया - चर्चगेटमधील गेटवे ऑफ इंडिया हे प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक. बऱ्याच चित्रपटाचे चित्रीकरण या ठिकाणी होत असतात. याशिवाय या ठिकाणी असलेल्या प्रसिद्ध पंचतारांकीत ताज हॉटेलमध्ये अनेकदा सिने तारे-तारका दिसून येतात.

9) धारावी - धारावीत झोपड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय येथे मातीची भांडी, कपडे आणि रिसायक्लिंग उद्योग केंद्रे आहेत. या ठिकाणी अनेक सिनेमांचे चित्रीकरण देखील होत असतात. त्यामुळे तुम्हाल बॉलिवूड स्‍टारची सहज भेट होऊ शकते.

10) महालक्ष्मी धोबी घाट - मुंबईतील महालक्ष्मी धोबी घाट येथे शहरभरातल्या लोकांचे कपडे धुतले जातात. या ठिकाणचे दृश्य देखील अनेकदा तुम्ही सिनेमात पाहिले असेल. त्यामुळे साहजिकच सिने कलाकारमंडळी या ठिकाणी येत असतात.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.