Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

'चल रंग दे' मोहिमेअंतर्गत वरळी नाका इथल्या घरांचा कायापालट

वरळी नाका इथल्या भिंतीवर रंगीबीरंगी कोलाज तुम्हाला पाहायला मिळेल. हा कोलाज सेना, नौसेना आणि वायुसेना यांना समर्पित करण्यात आला आहे.

'चल रंग दे' मोहिमेअंतर्गत वरळी नाका इथल्या घरांचा कायापालट
SHARES

असल्फा व्हिलेज, खार दांडा इथल्या घरांचा कायापालट केल्यानंतर 'चल रंग दे' टीमनं आपला मोर्चा वरळी नाका इथं वळवला आहे. वरळी नाका इथली घरं सध्या वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगली आहेत. वरळी नाका इथल्या भिंतीवर रंगीबीरंगी कोलाज तुम्हाला पहायला मिळेल. हा कोलाज सेना, नौसेना आणि वायुसेना यांना समर्पित केला आहे.

सेना, नौसेना आणि वायुसेनातले जवान कुठलाही स्वार्थ न बाळगता आपल्या देशाचं रक्षण करतात. घराच्या भिंती ज्याप्रकारे आपलं रक्षण करतात तसंच जवान देखील आपल्या देशाचं रक्षण करतात. एकप्रकारे ते संरक्षक भिंतीची भूमिका बजावतात. म्हणूनच 'चल रंग दे' च्या टीमनं तिन्ही दलाला उद्देशणारा एक कोलाज साकारला आहे. यामध्ये जवळपास ३५० स्वयंसेवक सहभागी झाले होते.

'चल रंग दे' च्या संस्थापक देदिपिया रेड्डी यांना याबाबत सांगितलं की, जवान हे भारत देशाचं आणि भारतियांचं रक्षण करतात. देशाच्या सुरक्षेसाठी ते बलिदान देतात. त्यांचं हे बलिदान प्रत्येक भारतीयांच्या लक्षात राहावं यासाठी आम्ही या घरांना हा रंग दिला आहे. आम्ही पांढरा, निळा आणि हिरवा अशा तीन रंगांमध्ये या भिंती रंगवल्या आहेत. हे रंग सेना, नौसेना आणि वायुसेना या तिन्ही दलातील जवानांचं बलिदान आणि शौर्य दर्शवतात.संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा