Advertisement

आर यु रेडी फॉर 'अंडरवॉटर फेस्टिव्हल'


आर यु रेडी फॉर 'अंडरवॉटर फेस्टिव्हल'
SHARES

मुंबई - आयुष्यात काही तरी तुफानी करावे असे प्रत्येकालाच वाटत असते. तुमच्यापैकी काहींची बकेट लिस्ट तयारही असेल. स्कुबा डायविंग, स्काय डायविंग, पॅराग्लायडिंग आणि बंजी जंपिंग असे अनेक अॅडव्हेंचर प्रत्येकाच्या विशलिस्टमध्ये असतातच. अशाच एका भन्नाट स्पोर्ट्स एक्टिव्हिटीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सायकलिंग, चेस, टिकटॅक, हॉकी अशा अनेक स्पोर्ट्स एक्टिव्हिटींचा यात समावेश आहे. तुम्ही बोलाल या स्पोर्ट्स एक्टिव्हिटित भन्नाट असं काय आहे? आम्ही जर तुम्हाला सांगितलं की हे स्पोर्ट्स अंडरवॉटर होणार आहेत तर? अवाक् झालात ना? सायकलिंग, चेस, हॉकीसारखे गेम अंडरवॉटर कसे खेळणार? हे प्रश्न नक्कीच तुम्हाला पडले असतील. इंडिया अंडरवॉटर फेस्टिव्हल आणि फिनकिक अॅडव्हेंचरतर्फे अंडरवॉटर फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. सो पॅक युवर बॅग्स. पण एकच मिनिट तुम्हाला यासाठी कुठे लांब जायची गरज नाही. कारण पहिल्यांदाच अंडरवॉटर फॅस्टिव्हल मुंबईत सुरू झाला आहे. विलेपार्लेतल्या प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलन येथे शनिवार आणि रविवारी अंडरवॉटर फेस्टिव्हलचं आयोजन केलंय. ५०० रुपये ते ३ हजार ७५० रुपये याच्या तिकिटाची किंमत आहे.

अंडरवॉटर फेस्टिव्हलची खासियत

स्कूबा डायविंग

या अंडरवॉटर फेस्टिव्हलमध्ये तुम्हाला स्कुबा डायविंगचा आनंद घेता येईल. तुम्हाला जरी पोहता येत नसेल तरी तुम्ही यात सहभागी होऊ शकता. तसेच इथे 'पाडि' या आंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रशिक्षक असणार आहेत. गोवा, श्रीलंका, इंडोनेशिया अशा देशांतून 'पाडि' इनस्ट्रक्टर या इव्हेंटसाठी आले आहेत. 

"अंडरवॉटर फेस्टिव्हल ही एक युनिक आयडिया आहे. मुंबईत प्रथमच अशा प्रकारचा अंडरवॉटर फेस्टिवल आम्ही आयोजित केलाय. स्कुबा डायविंगला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे हा या इव्हेंटचा उद्देश आहे. खरंतर समुद्रात स्कुबा डायविंग केले जाते. स्कुबा डायविंग करायचे असेल तर तारकर्ली, गोवा किंवा अंदमान येथे जावे लागते. इथे ये-जा करण्यात खूप खर्च होतो. त्यामुळेच आम्ही मुंबईत स्कुबा डायविंग घेऊन आलोय. पण आम्ही स्कुबा डायविंग स्विमिंग पूलमध्ये करणार आहोत. गेल्यावर्षी आम्ही पुण्यात अंडरवॉटर फेस्टिव्हलचे आयोजन केले होते.” 

-अंकित साबू, सहसंस्थापक, फिनकिक अॅडव्हेंचर

अंडरवॉटर हॉकी

स्कुबा डायविंगसोबत आणखी एक हटके स्पोर्ट्स तुम्हाला इथे पाहता येणार आहे आणि तो म्हणजे अंडरवॉटर हॉकी. अंडरवॉटर हॉकी हा बाहेरच्या देशांमध्ये खेळला जाणारा खेळ आहे. पण पहिल्यांदाच हा खेळ मुंबईत आयोजित अंडरवॉटर फेस्टिव्हलमध्ये खेळता येणार आहे.

"अंडरवॉटर हॉकी ही नवीन थीम घेऊन आम्ही येतोय. अंडरवॉटर हॉकी हा इंटरनॅशनल स्पोर्ट्स आहे. फ्रान्सच्या क्रिडा विभागाची नियामक संस्था 'सीमाज' यांनी आम्हाला यासाठी निमंत्रण दिलंय. भारताची अंडरवॉटर हॉकी टीम तयार करण्यासाठी 'सीमाज'नेच सांगितले आहे. या सोबतच अंडरवॉटर प्लेग्राऊंड उभारण्यात येणार आहे. कशा आणि किती स्पोर्ट्स एक्टिव्हिटीज असणार आहेत हे लवकरच ठरेल. पण चेस, पोलो, सायकलिंग अशा स्पोर्ट्स एक्टिव्हिटीज तुम्हाला पाहता येऊ शकतात.” 

-अंकित साबू, को फाऊंडर, फिनकिक अॅडव्हेंचर

वॉटर स्लॅकलायनिंग

वॉटर स्लॅकलायनिंग हा एक भन्नाट प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळू शकतो. वॉटर स्लॅकलायनिंग म्हणजे हवेत एका दोरीवर जसे बॅलेंस करतात त्याप्रकारे स्विपिंग पुलवर एक दोरी बांधली जाते. त्यावर बॅलेंस केला जातो. त्यामुळे तुम्ही पडलात तरी पाण्यातच पडाल. आणि तुम्हाला कोणतीही इजा होणार नाही. नक्की हा काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

गेल्यावर्षी पुण्यात अंडरवॉटर फेस्टिव्हल आयोजित केला होता. त्यावेळी फेस्टिव्हलसाठी जास्तीतजास्त २०० जणांची क्षमता होती. तर या वेळी मुंबईत होणाऱ्या अंडरवॉटर फेस्टिव्हलसाठी २ हजार ५०० जणांची क्षमता आहे.

सो आर यू रेडी फॉर अॅडव्हेंचर. मग वाट कसली बघताय?
https://www.facebook.com/indiaunderwaterfestival/ या फेसबुक पेजवर तुम्ही याची अधिक माहिती घेऊ शकता.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा