बचत गटांच्या वस्तूंची उत्तम विक्री

 Lower Parel
बचत गटांच्या वस्तूंची उत्तम विक्री
बचत गटांच्या वस्तूंची उत्तम विक्री
बचत गटांच्या वस्तूंची उत्तम विक्री
बचत गटांच्या वस्तूंची उत्तम विक्री
बचत गटांच्या वस्तूंची उत्तम विक्री
See all
Lower Parel, Mumbai  -  

लोअर परळ - बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, यासाठी परळ पूर्व येथील महापालिका एफ - दक्षिण कार्यालयाच्या परिसरात 20 आणि 21 ऑक्टोबरला दोन दिवसीय विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री सुरू करण्यात आली होती. त्यानंतर ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहता या बाजारपेठेचा एक दिवस वाढवण्यात आला. या बाजारपेठेत वस्तूंचे 25 स्टॉल लावण्यात आले होते. त्यात 30 बचत गटातील महिला सहभागी झाल्या होत्या.

महिलांनी तयार केलेले घरगुती मसाले, लोणचं, पापड, खाद्यपदार्थ, दिवाळीचे फराळी पदार्थ, सुका खाऊ, घर सजावटीचे सामान, फॅन्सी बॅग, ड्रेस मटेरियल, मोत्यांचे दागिने, इमिटेशन ज्वेलरी, शुभेच्छा पत्र, अगरबत्ती, अत्तर , विविध प्रकारची तोरणे आणि सजावट केलेल्या पणत्या त्याचबरोबर बच्चेकंपनींना आकर्षित करणारी खेळणी या बाजारपेठेत उपलब्ध होती.

एफ - दक्षिण सहायक आयुक्त विश्वास मोटे आणि नगरसेविका हेमांगी चेंबूरकर यांच्या सहकार्याने ही बाजारपेठ भरवण्यात आली असल्याचे समाजविकास अधिकारी मंगल नाईक यांनी सांगितले. या वर्षीही या प्रदर्शन आणि विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळाला.

Loading Comments