नोटबंदीचा ख्रिसमसच्या खरेदीवर परिणाम

वांद्रे - दरवर्षी वांद्र्याच्या मार्केटमध्ये होणारी गर्दी यंदा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मार्केटमध्ये ख्रिसमस ट्रीसह विविध सजावटींच्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. पण जुन्या नोटांवरील बंदीमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे. त्यामुळे यंदा सर्वच बाजारात नोटाबंदीचा परिणाम दिसत आहे. नोटबंदीला एक महिना उलटूनही पुरेसे चलन उपलब्ध नसल्यानं ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

Loading Comments