Advertisement

सोनिया-राहुल गांधींची जाहिरातीतून उडवली खिल्ली, कंपनीविरोधात आंदोलन करणाऱ्यांना अटक

कोरोना संकटात कलम १४४ चं उल्लंघन केल्याप्रकरणी ८ जणांना अटक केली आहे.

सोनिया-राहुल गांधींची जाहिरातीतून उडवली खिल्ली, कंपनीविरोधात आंदोलन करणाऱ्यांना अटक
SHARES

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (sonia Gandhi) यांची एका जाहिरातीत खिल्ली उडवल्याप्रकरणी काँग्रेस (Congress)नं नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी प्रकरणी मुंबईतील स्टोरिया (Storia) फूड कंपनी कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. कोरोना संकटात कलम १४४ चं उल्लंघन केल्याप्रकरणी ८ जणांना अटक केली आहे.

काँग्रेस कार्यकर्ते म्हणाले की, स्टोरिया फूड्सनं काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी यांची नुकत्याच एका जाहिरातीत खिल्ली उडविली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलीय. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबईतील स्टोरिया फूड्स कार्यालयासमोर निषेध केलाय. त्यांच्या निषेधावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

महाराष्ट्रात दररोज वाढत्या कोरोनाचे प्रकरण लक्षात घेता कलम १४४ लागू केलाय आणि लोकांना एकत्र जमण्यास बंदी आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ८ जणांना ताब्यात घेतले. सर्व आरोपींविरुद्ध आपत्कालीन कायदा आणि एनडीएमएच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काँग्रेसच्या निषेध आंदोलनाचं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगतापांनी (Bhai Jagtap) समर्थन केलंय. आदरणीय सोनियाजी गांधी (sonia Gandhi) आणि आदरणीय राहुलजी गांधी यांची STORIA कंपनीनं जाहिरातीमधून केलेल्या बदनामीला चोख उत्तर दिल्याबद्दल मुंबई काँग्रेस सरचिटणीस नितीन सावंत तसेच युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन व कौतुक !! असले घाणेरडे धंदे खपवून घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी!!, असा इशाराही ट्विट करत भाई जगताप यांनी दिलाय.हेही वाचा

केंद्रामुळेच महाराष्ट्रातील लसीकरण थांबलंय- नवाब मलिक

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा