Advertisement

शिंदे गटातील एक मंत्री उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, ठाकरे गटाचा मोठा दावा

तज्ञ मंडळींनी सांगितले की निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार आहे, असा दावा त्यांनी केला.

शिंदे गटातील एक मंत्री उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, ठाकरे गटाचा मोठा दावा
SHARES

ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केला आहे. शिंदे गटातील एक मंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे.

उदय सामंत हे स्वतः उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. कारण की शिंदे गटातील सर्वात शेवटी गेले आहेत. त्यामुळे ते 16 मध्ये आले नाही. यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. यांच्या गटातील अनेकजण आता फुटणार आहेत. त्यामुळे ते आमच्याकडे येऊ शकतात. उद्या काय परिस्थिती निर्माण होईल त्यावरून तेच होईल. मात्र, काही असो उद्धव ठाकरे यांचा मोठा विजय होईल, असा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे.


हेही वाचा : 

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे गटात तणाव


सत्ता संघर्षावर जी काही भूमिका आहे ती उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागेल. तज्ञ मंडळींनी सांगितले की निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार आहे. फडणवीस या गटाने धावपळ सुरू केली होती. यामुळे अनेकांनी अंदाज काढला. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्यामध्ये काहीतरी गडबड दिसते. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये देखील ठाकरेंच्या बाजूने निकाल लागेल, असा अंदाज लावला आहे. याच्या आधारावर निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार असल्याचा दावा खैरे यांनी केला आहे.

मी हिंदुत्वादी जरी असलो तरी मी देव भक्त आहे. मी कोर्टाला विनंती करू शकत नाही. मात्र, मी देवाला प्रार्थना करू शकतो. राज्याचा सत्ता संघर्षाचा निकाल हा निकाल उद्धवजींच्या बाजूने लागू दे. सत्ता संघर्षाच्या निकालानंतर जे जाणार आहे त्याच्यावर काय बोलायचं. उर्वरित आमदार जे आहे ते बाद होतील. मात्र, जे मस्तीत वागत होते. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्याबाबत काहीही बोलत होते. ती मस्ती लोकांना पटली नाही. ती मस्ती आता रिकामी होईल, असंही खैरे म्हटले आहेत.




हेही वाचा

सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी अजित पवारांचा मोठा दावा

न्यायपालिका स्वतंत्र आहे की कुणाच्या दबावाखाली काम करतीये, याचा फैसला उद्या : संजय राऊत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा