Advertisement

विकास इधर है!

राष्ट्रवाद (nationalism) आणि विकास (development) या दोन मुद्द्यांभोवतीच प्रामुख्याने दिल्ली विधानसभा निवडणूक फिरत राहिली.

विकास इधर है!
SHARES

दिल्ली विधानसभेचे निकाल (delhi vidhan sabha election 2020 results) नुकतेच हाती आले. या निवडणुकीत आम आदमी पार्टीने (aam aadmi party) दणदणीत विजय मिळवला. ही निवडणूक अनेक अर्थांनी गाजली. भाजप आणि आप या दोन पक्षांमध्येच प्रामुख्याने ही लढत होती. ज्यात भाजपने नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही राष्ट्रवादाचा डाव खेळला. तर आपने केलेल्या कामांच्या जोरावर जनतेकडून मतं मागितली. त्यामुळे राष्ट्रवाद (nationalism) आणि विकास (development) या दोन मुद्द्यांभोवतीच प्रामुख्याने ही निवडणूक फिरत राहिली. अखेर दिल्लीकरांनी राष्ट्रवादाला खतपाणी न घालता विकासाच्या बाजूने कौल देत दिल्लीच्या राजकारणाला नवी दिशा दिली.   

या निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने ७० पैकी तब्बल ६२ जागा जिंकत भाजपचा सपशेल पराभव केला. भाजपच्या वाट्याला अवघ्या ८ जागा आल्या. तर एकेकाळी शीला दिक्षित (sheela dikshit) यांच्या नेतृत्वाखाली विजयाची हॅटट्रीक साधणाऱ्या काँग्रेसची पाटी मात्र या निवडणुकीत कोरीच राहिली. 

 

या निवडणुकीत भाजपच्या हाती शाहीन बाग (shaheen bagh protest) आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादाचा आयता मुद्दा आला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi), गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत प्रत्येक भाजपचा नेता कलम ३७०, राम मंदिर, एअर स्ट्राइक या मुद्द्यांसोबतच शाहीन बागचं अस्त्र जाणीवपूर्वक परजत होता. यामुळेचं की काय तर अगदी निकालाच्या दिवसापर्यंत भाजपला आपण मोठ्या फरकाने विजय मिळवणार असं वाटत होतं. 

 हेही वाचा-AAP पाठोपाठ महाराष्ट्रातही १०० युनिट वीज मोफत…


या उलट अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाने अत्यंत थंड डोक्याने आपली रणनिती आखली होती. संतुलन ढळू न देता शेवटपर्यंत आपचे सर्वच नेते आपल्या प्लानला चिकटून राहिले. निवडणुकीआधी आश्वासनांची खैरात वाटण्याआधी आपने सगळ्यात पहिल्यांदा मागील ५ वर्षांचं रिपोर्ट कार्ड दिल्लीकरांपुढं सादर केलं. यामुळे दिल्लीकरांमध्ये विश्वासनिर्मिती होण्यास मोठा हातभार लागला. त्यानंतरही वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्य या मुख्य पायाभूत सोईंवर आपने भर दिला. ज्याचा खूप मोठा परिणाम दिल्लीकरांच्या मानसिकतेवर झाला. 

सन २०१५ च्या निवडणुकीत भाजपने किरण बेदी (kiran bedi) यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून दिल्लीच्या रिंगणात उतरवलं होतं. परंतु यावेळची निवडणूक भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी या ब्रँडनेमवरच लढवली. दिल्ली विधानसभा आपल्या ताब्यात यावी याकरीता भाजपने पूर्ण जोर लावला होता. त्यासाठी अख्ख्या देशभरातील मातब्बर नेत्यांची फौज भाजपने (bjp) दिल्लीत प्रचारासाठी उतरवली होती. ज्यात महाराष्ट्रातील डझनभर नेत्यांचाही समावेश होता. यामुळे केजरीवाल विरूद्ध भाजपची संपूर्ण टीम असं या लढतीचं चित्र तयार झालं. यांत केजरीवालांनी ((arvind kejriwal)) हिंमत असेल तर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करा, असं म्हणत भाजपला एकहाती टक्कर दिली. त्याचा मोठा सेटबॅक भाजपला बसला. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दिल्लीत ६५ विधानसभा क्षेत्रात आघाडी मिळवली होती. परंतु अवघ्या ९ महिन्यांमध्ये भाजपला ही आघाडी गमवावी लागली. 

 

काँग्रेस तर या निवडणुकीत कुठेच नव्हती. आप आणि भाजप या दोघांच्या रणधुमाळीत आपला निभाव लागणार नाही. या भीतीने काँग्रेसच्या (congress) नेत्यांनी आधीच हातपाय गाळून आपला पराभव मान्य केला होता. नाही म्हटलं तर राहुल गांधी (rahul gandhi) आणि प्रियांका गांधी यांनी दोन-चार सभा घेतल्या. परंतु त्यांचा जोर प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यावरच राहीला. ही निवडणूक गांभीर्याने घेत लढवली असती, तरी आप आणि भाजपविरोधी मतं काँग्रेसला पडली असती, पण तसं झालं न झाल्याने काँग्रेसविरोधी आणि भाजपविरोधी मतांचा पूर्ण लाभ हा आपच्या उमेदवारांना झाला. 

 हेही वाचा- आता देशात जन की बातच चालणार- उद्धव ठाकरे


पंतप्रधान मोदी (pm narendra modi) आणि अमित शहा खुलेआमपणे शाहीन बागमध्ये (shaheen bagh) होत असलेल्या आंदोलनाला केजरीवाल यांच्या आपचा पाठिंबा आहे, असा आरोप करत असताना केजरीवाल यांनी मात्र या आंदोलनाचं तसंच सीएएचं (caa) उघडपणे समर्थन केलं ना विरोध केला. उलट दिल्ली पोलीस यंत्रणा माझ्या हातातच नाही, तर मी काय करू? असा सवाल उपस्थित करून त्यांनी चाणाक्षपणे भाजपवरच संशयाची सुई रोखली. शिवाय मी हनुमानाचा भक्त आहे, असं म्हणत मतदानाच्या एक दिवस आधी हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्यांनी भापला चिमटा काढण्याचाही प्रयत्न केला. 

भाजपच्या (bjp) राष्ट्रवादापुढे (nationalism) आपचा निभाव लागण्यात सर्वात महत्त्वाचा स्ट्राँग पाॅईंट ठरला तो विकासाचा ((development)) अजेंडा. केजरीवाल यांनी सत्तेत येताच खासगी शाळांच्या मनमानी फी वाढीवर चाप लावला. तर सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यावर भर दिला. यासाठी त्यांनी शिक्षणवरील निधी ६,६०० कोटी रुपयांवरून वाढवत १५,६०० कोटी रुपयांवर नेला. केजरीवाल सरकारने २०० शाळांमध्ये नवीन २० हजार वर्ग सुरू केले. परिणामी पालक आपल्या मुलांना खासगी शाळेतून काढत सरकारी शाळांमध्ये दाखल करू लागले.  

आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करताना केजरीवाल (arvind kejriwal) सरकारने दिल्लीत ४०० मोहल्ला क्लिनिक (mohalla clinic) सुरू केले. जिथं २१२ पद्धतीच्या टेस्ट मोफत केल्या. त्यांच्या उपक्रमाचं कौतुक डब्ल्यूएचओ ने देखील केलं. मोफत वीज आणि पाणी (free electricity and water) हे तर केजरीवाल सरकारचे या निवडणुकीत स्टार प्रचारक राहिले. त्यामुळे यापुढे २०० युनिटपर्यंत वीज मोफत आणि ४०० युनिटपर्यंत वीजबिलावर ५० टक्के सबसिडी देण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली आहे. त्यांच्या या योजनेचा ४० लाखांहून अधिक लोकांना फायदा पोहचत आहे. शिवाय दरमहा २० हजार लिटर पाणी मोफत देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

 

निवडणुकीच्या ३ महिने आधी केजरीवाल सरकारने सरकारी बस आणि मेट्रोत महिलांसाठी मोफत (women safty) प्रवासाची सवलत उपलब्ध करून दिली.  महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, स्ट्रीट लाइट इत्यादी व्यवस्था देखील उभारल्या. 

 हेही वाचा-दिल्लीकरांनी भाजपचा अहंकार उतरवला- अनिल परब


या सर्व कामांचा एकत्रित लाभ या वेळच्या निवडणुकीत केजरीवाल यांना झाला. या निवडणुकीकडे पाहत राष्ट्रवादावर विकासकामे भारी पडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे देशभरातील नेत्यांनी केजरीवाल यांच्या विजयाचं कौतुक केलं आहे. आता दिलेली आश्वासने पुढच्या ५ वर्षांत पूर्ण करण्याचं मोठं आव्हान केजरीवाल यांच्यापुढं असणार आहे. 
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा