'माझा आमदार माझा मुख्यमंत्री', मातोश्रीबाहेर पुन्हा लागले पोस्टर

काही दिवसांपूर्वीच हटवण्यात आलेले युवासेना प्रमुख आणि वरळीतील नवनिर्वाचीत आमदार आदित्य ठाकरे यांचे पोस्टर्स पुन्हा एकदा लावण्यात आले आहेत.

SHARE

काही दिवसांपूर्वीच हटवण्यात आलेले युवासेना प्रमुख आणि वरळीतील नवनिर्वाचीत आमदार आदित्य ठाकरे यांचे पोस्टर्स पुन्हा एकदा लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी पुन्हा नवे पोस्टर्स शिवसेनेनं लावले. 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर हे पोस्टर लावण्यात आले आहेत.

हेही वाचा- मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचा होणार- संजय राऊत

शिवसेना नगरसेवक हाजी हलीम खान यांनी मंगळवारी पहाटे 'मातोश्री'बाहेर हे पोस्टर लावले आहेत. 'माझा आमदार माझा मुख्यमंत्री' तसंच 'साहेब आपण करून दाखवलं' असं या पोस्टरमध्ये म्हटलं आहे. निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं असलं, तरी मुख्यमंत्रीपदासाठी युतीत रस्सीखेच सुरूच आहे. त्यातच शिवसेनेकडून ‘मुख्यमंत्री शिवसेने’चाच हे ठासून सांगितलं जात असल्याने या पोस्टर्स लावण्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

आदित्य ठाकरे यांनी सोमवारी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, चांदवड, मालेगाव, मनमाड, येवला आणि निफाड या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसंच नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचं आश्वासनही दिलं. हेही वाचा-

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, आदित्य ठाकरेंची राज्यपालांकडं मागणी

शिवसेनेचं संख्याबळ ६४ वर, 'या' आमदारानं दिला पाठिंबासंबंधित विषय
ताज्या बातम्या