Advertisement

पार्थ पवारांच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागानं छापा टाकला.

पार्थ पवारांच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा
SHARES

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागानं छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या कार्यालयावर छापेमारी झाली आहे.

याआधी आयकर विभागानं अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. यापैकी एक बहीण कोल्हापूर तर इतर दोन बहिणी पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागानं छापा टाकला आहे.

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी सुरू आहेत. इतकंच नाही तर अजित पवारांच्या तीन बहिणी आणि पार्थ पवार यांच्या कार्यालयात आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे.

त्याच बरोबर काही साखर कारखान्यांवर छापा टाकण्यात आलाय. हे साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाची बाब म्हणजे आता अजितदादांचे पुत्र पार्थ पवार आणि अजितदादांच्या तीन बहिणींच्या घरी छापेमारी सुरू आहे.

“आयटीनं कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा अधिकार आहे, शंका-कुशंका आल्यावर छापेमारी करू शकतात. माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. मी नियमित टॅक्स भरतो, अर्थमंत्री असल्यानं आर्थिक शिस्त कशी लावायची, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, टॅक्स कसा भरायचा असतो हे मला चांगलं माहिती आहे. माझ्या कंपन्यांचा टॅक्स वेळच्या वेळेला भरला जातो, तरीही राजकीय हेतूनं ही धाड टाकली की काय माहिती हवी होती? हे इन्कम टॅक्सलाच माहिती.”



हेही वाचा

११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक, 'हे' आहे कारण

क्रूझ कारवाईचे भाजप कनेक्शन, नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा