Advertisement

संकटं कितीही येवोत महाराष्ट्र सर्वांच्या पुढं राहील- अजित पवार


संकटं कितीही येवोत महाराष्ट्र सर्वांच्या पुढं राहील- अजित पवार
SHARES

संकटं कितीही येवोत हा महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही. संकटांवर मात करुन महाविकास आघाडीच्या कार्यकाळातही हा महाराष्ट्र सर्वांच्या पुढेच राहील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, आज राज्यात राष्ट्रवादीचा सहभाग असलेलं महाविकास आघाडीचं सरकार आहे. जनतेवर अन्याय होईल असा कोणताही निर्णय आम्ही होऊ देणार नाही. संकटे कितीही येवोत हा महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही. प्रत्येक संकटांवर मात करुन हा महाराष्ट्र सर्वांच्या पुढेच राहील, अशी ग्वाही देतो.

महाविकास आघाडी सरकारतर्फे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेऊन आरक्षण, जीएसटी, पीक विमा, १४ व्या वित्त आयोगाचे पैसे मिळावेत, तसंच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशा प्रकारच्या आग्रही मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत.

हेही वाचा- चहावाल्याकडूनच पंतप्रधानांना १०० रुपयांची मनी ऑर्डर, "दाढी नाही रोजगार वाढवा"

मराठा समाजाचे आरक्षण, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण आणि इतर प्रश्नांवर देखील काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, असं अजित पवार (ajit pawar) म्हणाले.

पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी गाठत आहेत. घरगुती गॅसचे दर वाढले आहेत. विमान-रेल्वेचा प्रवास महागला आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या सर्व प्रश्नांवर देखील आपल्याला काम करायचं आहे.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी कोरोना (coronavirus) काळात लोकांना मदत करण्याची भूमिका घेतली. आपल्याला आणखी काही दिवस अशीच मदत करावी लागणार आहे. महाविकास आघाडीकडून घेतले जाणारे लोककल्याणाचे निर्णय तळागाळात पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भाजपच्या काळात देशात दमनशाहीचा कारभार सुरु असून लोकशाही मोडून काढण्याचा हे प्रयत्न सुरु आहे. पत्रकारांवर निरनिराळे निर्बंध आणून त्यांना केंद्र सरकारच्या बाजूने बोलायला भाग पाडलं जात आहे. आपण सर्वांनी लोकशाही अबाधित राखण्यासाठी काम करायचं आहे, असं अजित पवार म्हणाले. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा