Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

चहावाल्याकडूनच पंतप्रधानांना १०० रुपयांची मनी ऑर्डर, "दाढी नाही रोजगार वाढवा"

चहावाल्यानं पंतप्रधानांच्या दाढीवर आक्षेप घेतला आहे. दाढी कट करण्यासाठी चहावाल्यानं पंतप्रधानांच्या नावावर १०० रुपयांचे मनीआर्डरही केलं आहे.

चहावाल्याकडूनच पंतप्रधानांना १०० रुपयांची मनी ऑर्डर, "दाढी नाही रोजगार वाढवा"
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाढीची सध्या खूप चर्चा होत आहे. बारामतीच्या एका चहावाल्यानं पंतप्रधानांच्या दाढीवर आक्षेप घेतला आहे. दाढी कट करण्यासाठी चहावाल्यानं पंतप्रधानांच्या नावावर १०० रुपयांचे मनी आर्डरही केलं आहे.

अनिल मोरे हे बारामतीच्या इंदापूर रोडवर एका खासगी रुग्णालयासमोर 'टी हाउस' नावानं चहाची टपरी चालवतात. पंतप्रधान मोदींच्या दाढीवर लक्ष केंद्रीत करत मोरे यांनी बुधवारी म्हटलं की, 'देश कोरोना महामारीचा सामना करत आहे. देशात लोक मरत आहेत आणि त्यांचे रोजगार जात आहेत, मात्र पंतप्रधान मोदी आपली दाढी वाढवत आहेत. जर त्यांना काही वाढवायचे असेल तर त्यांनी लोकांसाठी रोजगार वाढवला पाहिजे.'

अनिल मोरे पुढे म्हणाले की, 'पंतप्रधान मोदींनी लोकांसाठी आरोग्य सुविधांसह लसीकरणामध्ये वेग आणायला हवा. अनिल मोरे पुढे म्हणाले की, लोकांच्या समस्यांचे समाधान होईल या गोष्टींकडे लक्ष ठेवायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पद देशातील सर्वात मोठे पद आहे. मी माझ्या कमाईमधून १०० रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाढी करण्यासाठी पाठवत आहे.'

अनिल मोरे पुढे म्हणाले, 'नरेंद्र मोदी हे देशाचे महान नेते आहेत आणि आम्ही त्यांचा सन्मान करतो. त्यांना दुखावणे आमचा हेतू नाही. मात्र ज्या प्रकारे कोरोना महामारीमुळे लोकांच्या अडचणी वाढत आहेत, त्यामुळे लोकांसाठी रोजगार वाढवले पाहिजे.'

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेले पत्र

आदरणीय पंतप्रधान जी,

भारतातील जवळपास सर्व जिल्हे, शहरी आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये २० मार्च, २०२० पासून मे २०२१ पर्यंत म्हणजेच मागच्या १५ महिन्यांमध्ये कोविड संक्रमणाचा प्रकोप एक राष्ट्रीय संकट बनून समोर आले आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे योग्य योजनांची कमतरता हे एक मोठे कारण आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार गेले आहेत आणि लोकांना भीक मागून जगावे लागत आहे.

आम्हाला ना राशन मिळत आहे, ना औषध आणि ना उपचारांसाठी सुविधा मिळत आहे. अशा परिस्थिती तुम्ही तुमची दाढी वाढवून काय सिद्ध करु इच्छितात. जर तुम्हाला काही वाढवायचे असेल तर निःशुल्क उपचारांच्या सुविधा वाढवा, लसीकरण वाढवा, रुग्णालयात उपचारांसाठी उपकरण आणि गुणवत्ता वाढवा, लोकांपर्यंत मोफन राशन पोहोचवा.

२०२२ पर्यंत सर्वांचे वीज बील माफ करा. भारतीयांसाठी मदत योजना वाढवा. 30 हजार रुपये प्रति कुटुंबाच्या हिशोबाने आर्थिक मदत प्रदान करा. कोविडमध्ये जीव गमावणाऱ्या सर्व कुटुंबांपर्यंत ५ लाखांची आर्थिक मदत प्रदान करा.

सर्व भारतीयांना टॅक्सच्या वसूलीमध्ये दोन वर्षांची सूट द्या. लॉकडाऊनच्या दरम्यान ज्यांना नुकसान झाले आहे, त्यांना नुकसान भरपाई द्या. त्यांना व्याज मोफत दीर्घकालिक कर्ज उपलब्ध करुन द्या.

आम्हाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी जिल्हा प्रशासनामध्ये संवेदनशीलतेची गुणवत्ता वाढवा, छोट्या आणि इतर उद्योग, शेतकऱ्यांना मदत द्या, कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नका, महागाईवर पूर्णपणे नियंत्रण ठेवा.

सर्व जीवनावश्यक वस्तू आणि इंधनाचे दर कमी करा, काळाबाजार बंद करा, सर्व स्तरावर शासन व पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासनाची रिक्त पदे लवकरात लवकर भरा.

आपण देशातील जबाबदार प्रथम नागरिक आहात. तुमच्यावर सर्वांची जबाबदारी आहे. राजकारण सोडून तुम्ही पहिले दाढी आणि कटिंग करा, तुमचे चांगले दिसणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला देश हितामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत.

तुम्ही चहावाले होते आणि मी देखील चहावाला आहे. यामुळे मी माझ्या मेहनतीच्या कमाईमधून १०० रुपये तुम्हाला दाढी आणि केस कापण्यासाठी पाठवत आहे. मी एक भारतीय नागरिक असल्याच्या नात्यानं तुम्हाला विनंदी करतो की, भारतीय नागरिकांच्या आवश्यक गरजांमध्ये सहयोग करा.हेही वाचा

बंद खोलीत ‘तो’ निर्णय तर झाला नाही ना?,आत्ताच सांगा नंतर कटकट नको; मनसेची मिश्कील टिप्पणी

“मोदी-ठाकरे भेटीनंतर चर्चा तर होणारच…”

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा