Advertisement

जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त, मनसे पदाधिकारी यांच्यात बाचाबाची

मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे आपल्या सहकाऱ्यांसोबत जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र कुमार जैन यांची भेट घेण्यास गेले असताना दोघांमध्ये ही बाचाबाची झाली.

जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त, मनसे पदाधिकारी यांच्यात बाचाबाची
SHARES

कमला मिल आग प्रकरणी मुंबईमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आणि पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकला जात असतानाच मनसे पदाधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे आपल्या सहकाऱ्यांसोबत जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र कुमार जैन यांची भेट घेण्यास गेले असताना दोघांमध्ये ही बाचाबाची झाली.



का झाली बाचाबाची?  

संदीप देशपांडे यांनी मनसेचे पदाधिकारी उत्तम सांडव आणि मंगेश कशाळकर या दोघांना मोजोस आणि बन अबव्ह या पबमधील अनधिकृत बांधकामावरील तक्रारीवर विविध उत्तरं दिली होती. त्यामुळे एक अधिकारी एकाच प्रकारच्या तक्रारीवर वेगवेगळी उत्तरं देत असल्याकारणाने जी दक्षिण विभाग सहायक अभियंता मिलिंद वटकर यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. पण जैन यांनी या तक्रारीचे अर्ज स्वीकारत 'आपण कारवाई करू' इतकं म्हणत संदीप देशपांडेंचं म्हणणे काही ऐकून घेतलं नाही. त्यामुळे देशपांडे, धुरी यांच्यासह इतर मनसे पदाधिकाऱ्यांनी जैन यांच्यासोबत बाचाबाची करण्याचा प्रयत्न केला.



हेही वाचा

कारवाईचं बारावं नको!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा