Advertisement

आमदार निवासाच्या दुरुस्तीचा आमदारांनीच घातला घाट!


आमदार निवासाच्या दुरुस्तीचा आमदारांनीच घातला घाट!
SHARES

अवघ्या २२ वर्षांत मनोरा आमदार निवास इमारत धोकादायक झाल्यामुळे खाली करण्यात येत असली, तरी काही आमदारांनी आपल्या खोल्या दुरुस्त करण्यासाठी चक्क लाखोंची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत ही लाखोंची उधळपट्टी का केली जात आहे? जनतेचे पैसे वाया घालवण्याचा अधिकार या आमदारांना कुणी दिला? असा सवाल उपस्थित केला जात आहे.



येथे आहे दुरुस्तीचे काम 

मनोरा आमदार निवासातल्या 'बी' विंगमध्ये, १२ व्या मजल्यावरील खोली क्रमांक १२१ आणि १२५ येथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. इमारतीच्या १२ व्या मजल्यावर नूतनीकरणाच्या कामासाठी नव्या टाईल्स आणि सिमेंटची पोती ठेवण्यात आली आहे. यातल्या एका खोलीत राष्ट्रवादीचे आमदार राहुल नार्वेकर, तर दुसऱ्या खोलीत बळीराम शिरसकर राहतात. 

विशेष म्हणजे नियमानुसार मनोरा आमदार निवास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे या इमारतीत बांधकाम खात्याच्या परवानगीशिवाय नूतनीकरणच काय पण साधे दुरुस्तीचे कामही करता येत नाही. त्यामुळे या खाली करण्यात येत असलेल्या इमारतीत नूतनीकरण करण्याची परवानगी कोणत्या अधिकाऱ्याने दिली? असा सवाल विचारला जात आहे.



आ. सुभाष साबणे यांनी उठवला आवाज

पावसाळी अधिवेशनादरम्यान मनोरा आमदार निवासातील एका खोलीचे छत कोसळल्याची घटना घडली होती. राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांच्या छताचा स्लॅब कोसळला होता. तेव्हा मनोरा आमदार निवासाची अवस्था अतिशय वाईट झाली असून अन्य ठिकाणी आमदारांच्या निवासाची सोय करण्यात यावी, यासाठी पावसाळी अधिवेशनात शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे यांनी आवाज उठवला होता. 

या तक्रारीची दखल घेत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सरकारने या प्रकाराची गंभीर दाखल घेण्याचे निर्देश दिले होते. विधिमंडळाचे सचिव अनंत कळसे यांनी आमदारांच्या निवासासाठी दक्षिण मुंबईत निवासस्थान भाडेतत्वावर देण्यासाठी जाहिरातही दिली होती. मात्र या जाहिरातीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घाटकोपर इथल्या शासकीय इमारतीत आमदारांना सदनिका देण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.


ही इमारत कमकुवत झाली असताना, या इमारतीत नूतनीकरणाला परवानगी कुणी दिली याची चौकशी करा.

- इम्तियाज जलील, आमदार, एएमआयएम



हेही वाचा - 

...आणि आमदार आंघोळ न करताच आले विधानसभेत!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा