Advertisement

खा. नवनीत राणांना डिस्चार्जनंतर पुन्हा कोरोना, मुंबईतच होणार क्वारंटाईन

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने दोघांनाही होम क्वारंटाईन राहण्यास सांगतलं आहे.

खा. नवनीत राणांना डिस्चार्जनंतर पुन्हा कोरोना, मुंबईतच होणार क्वारंटाईन
SHARES

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने दोघांनाही होम क्वारंटाईन राहण्यास सांगतलं असून त्यांनी मुंबईतच होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. (amravati mp navneet rana tested covid19 positive again after discharge from lilavati hospital)

यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.  नवनीत राणा यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर शनिवारी त्यांना आयसीयूतून बाहेर काढत साधारण वाॅर्डमध्ये हलवण्यात आलं होतं. त्यानंतर प्रकृती सुधारल्याने रवी राणा यांना शनिवारी तर नवनीत राणा यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेनं नवनीत राणा यांच्यासह रवी राणा यांची कोरोनाची चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला.

हेही वाचा - खासदार नवनीत राणा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय

नवनीत राणा यांना ६ ऑगस्टला कोरोना विषाणूची बाधा झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. नवनीत राणा यांची कोराेना टेस्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये आमदार रवी राणा यांचे वडील, आई, बहीण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या यांच्या सह खासदार नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलगाही करोनाबाधित निघाले.

त्यातच सुरूवातीला अमरावतीच्या स्थानिक रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नवनीत राणा यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतला. त्यानंतर २३ तासांचा प्रवास करून त्यांना नागपूरहून मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

हेही वाचा - तुमच्या आशीर्वादामुळेच मी वाचले, नवनीत राणांनी मानले आभार


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा