Advertisement

“वीज जोडणी तोडणाऱ्या ठाकरे सरकारचं जनतेपासून कनेक्शनच तुटलंय”

ठाकरे सरकारचं जनतेपासून कनेक्शनच तुटलं आहे. परंतु भाजप कुठल्याही प्रकारे ग्राहकांची वीज कापू देणार नाही, असा इशारा भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे.

“वीज जोडणी तोडणाऱ्या ठाकरे सरकारचं जनतेपासून कनेक्शनच तुटलंय”
SHARES

लाॅकडाऊनच्या काळात राज्यातील सर्वच वीज कंपन्यांनी ग्राहकांना वाढीव वीज बिलं पाठवल्याने ग्राहकांचा खिसा कापण्यात आल्याची भावना आहे. ही वीज बिलं माफ झालेली नसतानाच ज्यांनी वीज बिल भरलेलं नाही, त्यांची वीज जोडणी कापण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकारचं जनतेपासून कनेक्शनच तुटलं आहे. परंतु भाजप कुठल्याही प्रकारे ग्राहकांची वीज कापू देणार नाही, असा इशारा भाजप नेते आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी दिला आहे.

राज्यातील असे असंख्य वीज ग्राहक आहेत, ज्यांनी वाढीव वीज बिलात सवलत मिळेल या आशेवर अजूनही वीज बिलं भरलेली नाहीत. त्यातच वीज कंपन्यांनी मागील ७ ते ८ महिन्यांपासून वीज बिल न भरलेल्या ग्राहकांची वीज जोडणी एप्रिलपासून कापण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

हेही वाचा- अदानी पवारांच्या घरी येऊन गेल्यावर… राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

यावर प्रतिक्रिया देताना आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्रातील लाखो नागरिकांचं आणि शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकारचं सामान्य जनतेशी असलेला कनेक्टच तोडल्यासारखं आहे. त्यांचा जनतेशी संपर्क तुटलेला आहे. हे सातव्या आसमान मध्ये जगत आहेत. सामान्य ग्राहकांना मोफत वीज देणार होता, १०० युनिटपर्यंतची वीज कमी दराने देणार होता, त्याचं काय झालं? शेतकऱ्यांना मदत करणार होता, त्याचं काय झालं? निवडणुका संपल्यानंतर हे हात पुसून बाजूला होण्याचा प्रयत्न करत आहेत. याविरूद्ध सामान्य जनतेसाठी भाजप (bjp) कडा संघर्ष करेल आणि सामान्य जनतेचं वीज कनेक्शन तोडू देणार नाही.

याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी वीज बिल माफीवर विधान करत खळबळ उडवून दिली होती. लाॅकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना आलेल्या वीज बिल दरवाढीच्या प्रश्नावर राज्यात सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला होता. वाढीव वीज बिल माफ करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन केलं होतं. आम्ही सरकारकडे दादही मागितली होती. त्यानंतर ऊर्जामंत्र्यांनी वीज बिलात सवलत देण्याचं आश्वासन देखील दिलं होतं. परंतु अदानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी येऊन गेल्यावर मात्र सरकारने आपली भूमिका बदलली, असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केला होता.

(ashish shelar warns maharashtra government over electricity bill during lockdown)

हेही वाचा- विधानसभा अध्यक्षपद कुणाकडे जाणार?, शरद पवार म्हणाले...

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा