Advertisement

राणेंच्या प्रवेशाचा निर्णय संघ कसा घेईल? - भैय्याजी जोशी


राणेंच्या प्रवेशाचा निर्णय संघ कसा घेईल? - भैय्याजी जोशी
SHARES

'माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश द्यायचा की नाही, याबाबतचा विषय भाजपाशी निगडित आहे. हा निर्णय संघ कसा घेणार?' अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मंगळवारी दिली.

मंगळवारी लोअर परळ येथील कोकण प्रांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात दुपारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांची भेट घेतली. मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र कळू शकले नाही.

अमित शाह माझे मित्र आहेत, त्यांची सौजन्य भेट होती. काही चर्चा ही वैयक्तिक असते, ती सार्वजनिक सांगता येत नाही. नारायण राणें बाबत काय निर्णय घ्यावा हे भाजपाचे काम आहे. तर मी कसे ठरवणार. पक्ष ठरवेल.

भैय्याजी जोशी, सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवर संघ

सध्या नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू आहे. त्यातच कोकणातील जुन्या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राणे यांना भाजपमध्ये घेऊ नये, असा आग्रह धरल्याने राणेंचा प्रवेश रखडल्याचे बोलले जाते. त्यामुळे भैय्याजी जोशी यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये राणे यांच्याबाबत संघाचा कल विचारात घेतला गेला असावा, अशी शक्यता आहे.



हेही वाचा

नारायण राणे यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा