Advertisement

या 5 कारणांमुळे भाजपचा विजय शक्य

पालघर लोकसभेच्या जागेसाठी झालेली पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्वस्व पणाला लावलं. पण याव्यतिरिक्त आणखीही काही मुख्य कारणं आहेत ज्यामुळे भाजपला या निवडणुकीत विजय मिळवण्यात यश आलं आहे.

या 5 कारणांमुळे भाजपचा विजय शक्य
SHARES

खासदार चिंतामण वानगा यांच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या पालघर लोकसभेच्या जागेसाठी झालेल्या पोटनिवणुकांचा निकाल 31 मे रोजी जाहीर झाला. भाजपा-शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या या पोटनिवडणुकीत भाजपने मुसंडी मारली. भाजपचे आयात उमेदवार राजेंद्र गावित यांनी प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार आणि भाजपचे दिवंगत खासदार चिंतामणी वनगा याचा मुलगा श्रीनिवास यांचा 29,572 मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. राजेंद्र गावित यांनी 2 लाख 72 हजार मतांनी विजय मिळवला आहे.


वानगा कुटुंबियांनी मातोश्री गाठली

भाजपाचे खासदार चिंतामण वानगा यांच्या निधनानंतर भाजपानं वानगा कुटुंबियांकडं दुर्लक्ष केलं. त्यातच वानगा यांचे पुत्र श्रीनिवास वानगा यांना भाजपानं तिकीटही नाकारलं. यानंतर पालघरमध्ये एक वेगळचं राजकीय नाट्य रंगलं. नाराज वानगा कुटुंबियांनी पालघरवरून थेट वांद्रयातील मातोश्री गाठत कमळावर धनुष्यबाण रोखला. अधिकृतपणे सेनेत प्रवेश करत सेनेनं पहिल्यांदाच पालघर लोकसभेत उमेदवार दिला. तर दुसरीकडे काँग्रेसवर प्रचंड नाराज असणारे राजेंद्र गावित भाजपाच्या गळाला लागले नि भाजपानं या आयात उमेदवाराला उमेदवारी दिली.


भाजपच्या विजयामागची कारणं?

ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्वस्व पणाला लावलं. पण याव्यतिरिक्त आणखीही काही मुख्य कारणं आहेत ज्यामुळे भाजपला या निवडणुकीत विजय मिळवण्यात यश आलं आहे.

  • शिवसेनेची कमजोर उपस्थिती - पालघर लोकसभेच्या जागेवर शिवसेनेने 1989 पासून आपला कोणताही उमेदवार उभा केला नव्हता. भाजपशी असलेल्या युतीमुळे या मतदार संघात निरंतर संघटीत उमेदवार निवडणूक लढवत होते. ज्यामुळे शिवसेनेला आपले उमेदवार कधीच उभे करता आले नाही आणि याचाच फायदा आज भाजपला झाला.


  • बविआचं तगडं आव्हान - खरंतर शिवसेनेला भाजप व्यतिरिक्त बहुंजन विकास आघाडीचं तगडं आव्हान होतं. बहुंजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना या निवडणुकीत 2 लाखाहूनही अधिक मतं मिळाली. जर बहुजन विकास आघाडीला काँग्रेस आणि माकपाची साथ मिळाली असती तर या जागेवर बहुजन विकास आघाडीचा विजय निश्चित होता. कारण 2009 ते 2014 पर्यंत येथे बहुंजन विकास आघाडीचे बळीराम जाधव खासदार म्हणून निवडून आले होते.


  • योगी आदित्यनाथ यांना प्रचारामध्ये उतरवणं- पालघर मतदार संघात राहणारे अनेक उत्तरभारतीय मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी उत्तर प्रदेशच्या जवळपास 6 आमदारांना या निवडणुकीच्या प्रचारात उतरवलं. वसई, बोईसर, नालासोपारा या ठिकाणी उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने युक्ती चालवली.


  • विवेक पंडित यांचं समर्थन - राजकीय वर्तुळात हितेंद्र ठाकूर यांचे कट्टर वैरी मानले जाणारे आणि वसई विरारचे माजी आमदार विवेक पंडित यांनी भाजपला समर्थन दिलं. वसई-विरारमध्ये विवेक पंडित यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे नक्कीच याचा भाजपला फायदा होणारच यात शंका नाही.


  • भाजपचा विजय, मत कमी - 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार चिंतामण वानगा यांनी 2 लाख 40 हजार मतांनी विजय मिळवला. पण या निवडणुकीत विजयाचा आकडा 30 हजाराच्या आसपास येऊन अडकला. जर भाजपने या निवडणुकीसाठी कंबर कसली नसती तर निकालाची आकडेवारी वेगळी असती.

हेही वाचा - 

पालघर लोकसभा पोटनिवडणूक: भाजपाचे गावित यांचा दणदणीत विजय

'हा' निवडणूक आयोगाचा विजय- राऊत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा