Advertisement

शिवसेनेचा अंत जवळ आलाय… निलेश राणेंचा पुन्हा हल्ला

भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ड्रग्ज रॅकेट प्रकरणावरून शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. एवढंच नाही, तर शिवसेनेचा अंत जवळ आलाय, असं म्हणत टोमणा देखील हाणला आहे.

शिवसेनेचा अंत जवळ आलाय… निलेश राणेंचा पुन्हा हल्ला
SHARES

नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेनेवर गंभीर आरोप करणारे भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ड्रग्ज रॅकेट प्रकरणावरून शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. एवढंच नाही, तर शिवसेनेचा अंत जवळ आलाय, असं म्हणत टोमणा देखील हाणला आहे. (bjp leader nilesh rane criticises shiv sena over drugs racket involvement in sushant singh rajput case)

काय ओळख होती शिवसेनेची आणि आता काय झाली आहे. बलात्कारी, ड्रग्स व्यापारी, खंडणी मागणारे, मर्डर केस, चमडी केस ही ओळख आजच्या शिवसेनेची. मराठीमध्ये म्हण आहे ‘अति तिथे माती‘... शिवसेनेचा अंत जवळ आलाय, असं निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाती चौकशीवरून राणे पितापुत्राकडून सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेना नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्पावरून देखील निलेश राणे यांनी शिवसेनेवर अनेक आरोप केले आहेत. 

हेही वाचा - नाणार प्रकल्प पुन्हा रत्नागिरीत आणण्यासाठी प्रयत्न, नीलेश राणेंचा गंभीर आरोप

नीलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन नाणार रिफायनरी प्रकल्पाविषयी अनेक दावे करत शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. नाणारचा विषय आमच्यासाठी संपला असल्याचं शिवसेनेचे स्थानिक मंत्री, आमदार, खासदार नेहमी बोलत असतात. परंतु नाणारची एक कमिटी हा प्रोजेक्ट पुन्हा आणू पाहत आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये नव्हे, तर राजापूरमध्ये व्हावा यासाठी एका कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पडद्यामागून मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहेत. प्रकल्प रद्द झाल्याचं सांगत असाल, तर चर्चा कशासाठी होत आहेत ? असा प्रश्न नीलेश राणे यांनी केला.

नाणारमध्ये सुगी डेव्हलपर्स नावाच्या कंपनीने १४०० एकर जमीन घेतली आहे. दीपक वायंगणकर या व्यक्तीमार्फत ही जागा घेण्यात आली आहे. या सुगी डेव्हलपर्सच्या संचालकांमधील एक संचालक निशांत सुभाष देशमुख हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत. त्यांचे एकमेकांसोबतचे अनेक फोटो आहेत, हे संबंध ते नाकारू शकत नाही, असंही नीलेश राणे म्हणाले.

हेही वाचा - पुरावे नष्ट करायला ‘त्यांना’ ६० दिवस मिळाले, निलेश राणेंचा पुन्हा आरोप

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा