Advertisement

अनिल परब तुम्हालाही मोठा झटका बसणार- भाजप

तुमच्यासारख्या भ्रष्टाचाऱ्याला आता कुणीही वाचवू शकणार नाही, असा आरोप करत महाराष्ट्र भाजपने शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

अनिल परब तुम्हालाही मोठा झटका बसणार- भाजप
SHARES

तुम्ही केलेल्या पापाची शिक्षा तुम्हाला तुमच्याच वसुली कांडमुळेच मिळणार, तुमच्यासारख्या भ्रष्टाचाऱ्याला आता कुणीही वाचवू शकणार नाही, असा आरोप करत महाराष्ट्र भाजपने शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र भाजपने (bjp) आपल्या ट्विटर हँडलवर एकापाठोपाठ एक असे तीन ट्विट करत अनिल परब यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली आहे. भ्रष्ट देशमुख आणि वाझेंसोबत  कोट्यावधींचा वसुलीकांड करून हिंदुहृदयसम्राट दि. बाळासाहेबांची खोटी शपथ घेताना तुम्हाला लाज वाटली नाही का? दुर्दैव हेच की बाळासाहेबांचेच पुत्र या भ्रष्ट अनिल परब यांची पाठराखण करत आहेत. वसुलीखोर अनिल परब तुम्हालाही लवकरच एक मोठा झटका बसणार.

हेही वाचा- अनिल देशमुखांनी पवारांच्या मनधरणीसाठी मागितली खंडणी, आता सचिन वाझेंचा ‘लेटरबाॅम्ब’

वसुलीखोर अनिल परब यांच्यावर सीबीआयचा छापा पडल्यानंतर आता याच वसुलीकांडातील सूत्रधार अनिल परब यांचेही सगळे कर्मकांड बाहेर पडणार आहेत. याच कटात सामील असलेले काही भ्रष्टाचारी लोकं आता परबांना वाचवायला येऊ शकणार नाहीत. तुमच्यासारख्या भ्रष्टाचाऱ्याला आता कुणीही वाचवू शकणार नाही.

कोरोनाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही त्यांच्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. कर्मचाऱ्यांना आत्महत्येचा मार्ग निवडावा लागला. तुम्ही केलेल्या या पापाची शिक्षा तुम्हाला तुमच्याच वसली कांडमुळेच मिळणार. कोरोनाच्या काळात परिवहन सेवा देशोधडीला लावून एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं. मात्र आता या वसुलीकांडातून तुमची सुटका नाही. पापाचा घडा भरलाय आता सीबीआयद्वारे लवकरच धडकी भरणार, असा इशारा अनिल परब यांना भाजपकडून देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी निलंबित सहायक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात अनिल परब यांनी महापालिकेशी संलग्न असलेल्या ५० कंत्राटदाराकडून प्रत्येकी २ कोटी रुपये खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा दावा केला होता. त्यामुळे अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी सातत्याने भाजपकडून केली जात आहे.

(bjp maharashtra slams shiv sena leader anil parab in extortion case)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा