Advertisement

सर्व केशरी रेशनकार्डधारक मुंबईकरांना महापालिकेने लस द्यावी- भाजप

केशरी रेशनकार्ड असलेल्या १८ ते ४५ वर्षे वयोगटातील सर्व मुंबईकरांना मुंबई महापालिकेने स्वखर्चाने कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी केली आहे.

सर्व केशरी रेशनकार्डधारक मुंबईकरांना महापालिकेने लस द्यावी- भाजप
SHARES

केशरी रेशनकार्ड असलेल्या १८ ते ४५ वर्षे वयोगटातील सर्व मुंबईकरांना मुंबई महापालिकेने (bmc) स्वखर्चाने कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी मागणी भाजपचे अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र देखील लिहिलं आहे.

याबाबत अधिक माहिती देताना अमित साटम यांनी सांगितलं आहे की, येत्या १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना देखील लस घेण्याची परवानगी नुकतीच केंद्र सरकारने दिली आहे. त्यानुसार या वयोगटातील नागरिकांना खासगी रुग्णालयांतही कोरोनावरील लस घेता येणार आहे. त्यामुळे मुंबई महापलिकेच्या आयुक्तांना माझी अशी विनंती आहे की, या वयोगटातील केशरी रेशनकार्डधारकांचं लसीकरण (दोन्ही डोस) महापालिकेच्या निधीतून करण्यात यावं. 

हेही वाचा- तर, महाराष्ट्रात मोठं संकट निर्माण होईल, नवाब मलिक यांची भीती

यासाठी सुमारे १ हजार कोटी रुपये खर्च होतील. मुंबई महापालिकेकडे ६० हजार कोटी रुपयांची एफडी आहे. गेल्या वर्षभरात महापालिकेने कोविड सुविधांवर (coronavirus) हजारो कोटी रुपये खर्च केलेले आहेत तसंच मुंबई शहर पूर्णपणे बंद ठेवल्याचा अनेकांवर आर्थिक ताण पडलेला आहे. म्हणूनच कोरोनाच्या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडून, सर्वकाही पूर्वपदावर यावं, यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन सर्वांचं लसीकरण करावं, अशी मागणी मी केली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र देखील पाठवलं आहे, असं अमित साटम यांनी सांगितलं.

दरम्यान, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेगही वाढवण्याची गरज व्यक्त करतानाच मुंबईत २२७ वाॅर्डांमध्ये लसीकरण केंद्र उभारण्यात यावं, अशी सूचना राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिकेला केली आहे.  

सद्यस्थितीत मुंबईत ७३ खासगी, ३९ महापालिका आणि १७ राज्य सरकारची रुग्णालयं अशा १३० ठिकाणी लसीकरण सुरू आहे. महापालिकेने जवळपास २.७६ लाख लोकांना लशीचे दोन्ही डोस दिले असून १७.६६ लाख लोकांना आतापर्यंत लशीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे. 

(bjp mla amit satam demand free covid 19 vaccine for all orange ration card holder mumbaikars form bmc)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा