Advertisement

‘या’ कारणासाठी आशिष शेलारांनी घेतली शरद पवारांची भेट

भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात नेहमीप्रमाणे चर्चांना उत आला. त्यानंतर आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भेटीचं नेमकं कारण सांगितलं.

‘या’ कारणासाठी आशिष शेलारांनी घेतली शरद पवारांची भेट
SHARES

भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात नेहमीप्रमाणे चर्चांना उत आला. त्यानंतर आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भेटीचं नेमकं कारण सांगितलं.

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि शरद पवार यांच्यात ६ जनपथ या निवासस्थानी सकाळी बैठक झाली होती. या भेटीनंतर लगेचच आशिष शेलार (ashish shelar) शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याने शंका कुशंका व्यक्त होऊ लागल्या. 

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून शेलार यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचा अंदाज बांधला जाऊ लागला. तर दुसरीकडे  महाराष्ट्रात ईडीच्या मुद्द्यावरूनही राजकारण तापलेलं असताना या प्रश्नावरही दोघांमध्ये चर्चा होऊ शकते, असं म्हटलं जाऊ लागलं.

अखेर आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली. ते म्हणाले, “मराठा आरक्षण प्रकरणी मराठा तरुणांच्या भावना अतिशय तीव्र आहेत, हे शरद पवार यांना ठाऊक आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडताना या विषयाचं राज्य सरकारकडून गांभीर्य राखलं जावं, अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळेच राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील आपली भूमिका स्पष्ट करावी आणि आरक्षणाविषयी तातडीने योग्य कायदेशीर पावलं लगेच उचलावीत, याबद्दल शरद पवार (sharad pawar) यांच्यासोबत चर्चा केल्याचं आशिष शेलार म्हणाले.

हेही वाचा- “अशोक चव्हाण यांची भूमिका आरक्षणाच्या बाजूची की काँग्रेसची?”

दरम्यान शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण प्रश्नावरून अशोक चव्हाण यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. एवढंच नाही, तर अशोक चव्हाण यांची पदावरून हाकालपट्टी करून त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मराठा आरक्षणाच्या विषयांची जबाबदारी सोपवण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याकडे केली.

दिल्लीत घेण्यात आलेल्या बैठकीत अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी जाणीवपूर्वक अनेक महत्त्वाच्या लोकांना बोलावलं नाही. आपल्या आजूबाजूच्या काँग्रेसच्या लोकांना घेऊन बैठकीत फार्स उभा करत आहे. अनेक याचिकाकर्त्यांच्या वकिलांना देखील बैठकीत निमंत्रीत करण्यात आलं नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, गरीब मराठा समाजाला लाभ व्हावा, असं अशोक चव्हाण यांचं वर्तन मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष झाल्यापासून दिसत नाही. त्या दृष्टीने ते कोणतेही ठोस निर्णय घेत नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगावं की अशोक चव्हाण घेत असलेली भूमिका त्यांची आहे की काँग्रेसची? असा प्रश्न देखील विनायक मेटे यांनी उपस्थित केला.

(bjp mla ashish shelar meets ncp chief sharad pawar in delhi on maratha reservation issue)

हेही वाचा- राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत, तरीही केलं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement