Advertisement

राज्य सरकार नियोजन शून्य, भाजपची टीका

वीज पुरवठा खंडित होण्याला जबाबदार कोण? याचा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तातडीने खुलासा करावा, अशी मागणी विरोधी पक्ष भाजपकडून केली जात आहे.

राज्य सरकार नियोजन शून्य, भाजपची टीका
SHARES

वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने सोमवार १२ आॅक्टोबर रोजी सकाळी संपूर्ण मुंबई महानगर परिसरातील व्यवहार २ तासांहून अधिक काळासाठी ठप्प झाले होते. यामध्ये विद्यार्थी, प्रवासी आणि रूग्णांचे चांगलेच हाल झाले. याला जबाबदार कोण? याचा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तातडीने खुलासा करावा, अशी मागणी विरोधी पक्ष भाजपकडून केली जात आहे. (bjp mla ashish shelar slams maha vikas aghadi government on power failure in MMR region)

महावितरणच्या कळवा येथील सब स्टेशनमधील यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे संपूर्ण मुंबई महानगरातील वीजपुरवठा सोमवारी सकाळी अचानक खंडित झाला होता. या तांत्रिक बिघाडाचा फटका सर्वच स्तरातील जनतेला बसला. पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने लोकल ट्रॅकवरच उभ्या राहिल्या. यामुळे प्रवाशांना नाईलाजाने ट्रॅकवर उतरुन पायी प्रवास करावा लागला, रस्त्यांवरील सिंग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला, रुग्णालयातील वीजही गेल्याने रुग्णांचे हाल झाले. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या.  

हेही वाचा - वीज कशामुळे गेली? मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश

त्यानंतर तब्बल अडीच तासांनी वीज पुरवठा सुरळीत झाल्याने सर्व व्यवहार हळुहळू पूर्वपदावर येऊ लागले. परंतु या दरम्यान जनतेला झालेल्या त्रासाला जबाबदार कोण असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले. 

राज्य सरकार नियोजन शून्य, व्यवहार शून्य आणि कल्पना शून्य असल्याने आज विद्यार्थी, प्रवासी, रुग्ण आणि जनतेचे अचानक गेलेल्या वीजेविना हाल झाले. याबाबत ज्या अधिकाऱ्यांचं नियोजन चुकलं त्यांच्यावर कारवाई करा. ऊर्जा मंत्र्यांनी तातडीने खुलासा करावा, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली.

दरम्यान मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशीदेखील त्यांनी चर्चा केली व मुंबई तसंच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असंही त्यांनी सांगितलं. मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसंच कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

हेही वाचा - खंडित वीज पुरवठ्यामुळे मुंबई विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा