Advertisement

Latest News: जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?, भाजपचा खोचक सवाल

उत्तर प्रदेशातील धर्मांतराच्या षडयंत्रात सहभागी असल्याच्या आरोपावरून उप्र पोलिसांनी बीडच्या एका युवकाला अटक केली आहे. त्याचे लागेबांधे निश्चितच महाराष्ट्रात खोलवर पसरलेले असणार. ठाकरे सरकारने ही पाळेमुळे खणून काढावीत.

Latest News: जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?, भाजपचा खोचक सवाल
SHARES

उत्तर प्रदेशातील धर्मांतराच्या षडयंत्रात सहभागी असल्याच्या आरोपावरून उप्र पोलिसांनी बीडच्या एका युवकाला अटक केली आहे. त्याचे लागेबांधे निश्चितच महाराष्ट्रात खोलवर पसरलेले असणार. ठाकरे सरकारने ही पाळेमुळे खणून काढावीत. जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का? असा प्रश्न विचारत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला देखील हाणला आहे.

उत्तर प्रदेशात ३ हजारांहून अधिक गरीब आणि अपंगांचं धर्मांतर करण्यात आलं होतं. हे धर्मांतर करण्यासाठी इस्लामिक राष्ट्रांकडून तसंच कॅनडातूनही मोठ्या प्रमाणात निधी आला होता. या निधीच्या माध्यमातून हे धर्मांतर करण्यात आलं होतं. या धर्मांतराची उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. 

धर्मांतरांच्या घटना वाढल्याचा दावा करत योगी सरकारने उत्तर प्रदेशात धर्मांतर विरोधी कायदा लागू केला आहे. या कायद्यांतर्गत अनेक ठिकाणी कारवाया केल्या जात आहेत.

हेही वाचा- कायद्यासमोर कोणालाही पळवाट काढता येत नाही- प्रविण दरेकर

या धर्मांतर प्रकरणात बीड कनेक्शन उघडकीस आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केलेल्या ३ आरोपींपैकी एक आरोपी बीडच्या परळी तालुक्यातील शिरसा या गावचा रहिवासी आहे. इरफान शेख असं या अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याचा धर्मांतर प्रकरणात सहभाग असल्याचंही समोर आलं आहे. 

या प्रकरणात सुरूवातीला उत्तर प्रदेश पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली होती. या दोघांच्या चौकशीत आणखी तीन लोकांची नावं समोर आली. त्यापैकी एक जण दिल्लीचा, दुसरा गुरूग्रामचा, तर तिसरा परळीतील शिरसा गावातील आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून हिंदुत्ववादी विचारधारेशी तडजोड केल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर करण्यात येत आहे. याच अनुषंगाने अतुल भातखळकर यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. 

(bjp mla atul bhatkhalkar slams cm uddhav thackeray in beed connection of religion conversion case of UP) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा