Advertisement

घोटाळ्यामुळेच माहिती लपवली जातेय - एकनाथ खडसे


घोटाळ्यामुळेच माहिती लपवली जातेय - एकनाथ खडसे
SHARES

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि राधेश्याम मोपलवार यांच्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले असतानाच, आता माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनीही सरकारला घरचा आहेर दिला आहे. 'एमआयडीसीच्या प्रकल्पांबाबत मी माहिती मागत आहे. दोन अधिवेशने उलटून गेली, तरी मला माहिती का दिली जात नाही?', असा प्रश्न एकनाथ खडसेंनी विधानसभेत सरकारला विचारला.


घोटाळ्यामुळेच माहिती लपवली जातेय

घोटाळा असल्यानेच माहिती लपवली जात असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी यावेळी सरकारवर केला आहे. सरकारवर खुद्द खडसेंनीच आरोप केल्याने विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे.


काय म्हणाले नाथाभाऊ...

राज्यभरातील जमीन संपादित करण्यासाठी सरकारने नोटिफिकेशन काढले. शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी घेतल्या. परंतु, त्या मोकळ्या केल्या. असे मोकळे केलेले किती भूखंड आहेत? हे मी सभागृहात विचारतोय. पण ते मला माहिती देऊ शकत नाहीत. मला ही माहिती सभागृहात सहा-सहा महिने मिळत नाही. माझी विनंती आहे की, आपल्या माध्यमातून ही माहिती मला पुढच्या आठवड्यात मंगळवार-बुधवारी मिळेल का?

एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी केलेले काम राज्याने पाहिले आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार माहिती मागत आहेत. तरीही त्यांना ती माहिती दिली जात नाही. आम्हीही ती माहिती मागतोय तर का देत नाही? कशासाठी देत नाही? आम्ही हक्कभंग आणू शकतो.

अजित पवार, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस


सरकार माहिती का लपवतेय?

वर्षभर भांडून देखील माहिती मिळत नसेल तर नेमके सरकार का माहिती लपवत आहे? असे काय आहे की, सरकार मला माहिती देऊ शकत नाही? असा प्रश्न खडसे यांनी यावेळी उपस्थित केला. या प्रकरणात फार मोठी अफरातफर झाली आहे का? म्हणून माहिती सभागृहात येत नाही का? असा आरोप खडसेंनी केला. दरम्यान, अधिवेशन संपण्याच्या आत सदर सदस्याला माहिती देण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले.


विरोधकांच्या हातात आयते कोलीत

नाथाभाऊंनी सभागृहात सरकारला कोंडीत पकडल्यानंतर विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार माहिती मागत आहेत तरी, त्यांना माहिती का दिली जात नाही? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी सरकारला विचारला.



हेही वाचा -

नाथाभाऊंनी घेतला विनोद तावडेंचा क्लास

खडसे 'कमबॅक'च्या तयारीत!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा