Advertisement

‘त्या’ पोलिसांना निलंबित करा, भाजप आमदाराची राज्यपालांकडे मागणी

अर्णब गोस्वामी यांना मारहाण करणाऱ्या ९ पोलिसांना ताबडतोब निलंबित करा आणि त्यांची चौकशी, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.

‘त्या’ पोलिसांना निलंबित करा, भाजप आमदाराची राज्यपालांकडे मागणी
SHARES

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (arnab goswami) यांना मारहाण करणाऱ्या ९ पोलिसांना ताबडतोब निलंबित करा आणि त्यांची चौकशी, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांना भेटून केली. इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी बुधवार ४ नोव्हेंबर रोजी अटक केली. अटक करताना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप अर्णब यांनी केला होता.

याच मागणीला धरून राम कदम (ram kadam) यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्याआधी राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील यासंदर्भात पत्र लिहिलं आहे, या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, रिपब्लिक टीव्हीचे संस्थापक आणि ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी मुंबई निवासस्थानाहून अटक केली. या अटकेदरम्यान काही पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करत अर्णब गोस्वामी यांच्याशी गैरवर्तन केलं आणि त्यांना मारहाण केली.

आम्ही पोलीस दलाचा, खाकी वर्दीचा आदर करतो. पण महाराष्ट्र सरकारच्या दबावाखाली अर्णब गोस्वामी यांच्यासोबत होणारं गैरवर्तन देश सहन करणार नाही. त्यामुळे त्यांना मारहाण करणाऱ्या ९ पोलिसांना निलंबित करून त्यांच्या चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे. (bjp mla ram kadam meet governor bhagat singh koshyari in arnab goswami arrest issue)

हेही वाचा - ‘तो’ कदाचित त्यांचा लाऊडस्पीकर असेल, संजय राऊत यांचं भाजपला प्रत्युत्तर

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारितेवर हल्ला केला आणि महाराष्ट्राला अघोषित आणीबाणीत ढकललं. त्यांनी अर्णब गोस्वामी यांची ताबडतोब सुटका करून देशाची माफी मागावी.

खाकी वर्दीचा गैरवापर करून अर्णब गोस्वामींवर हल्ला करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केली गेली नाही व मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी देशाची माफी मागितली नाही, असं आम्हाला राज्यपालांकडे दाद मागावी लागेल, अशी मागणीही राम कदम यांनी केली आहे.

दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना अलिबाग जिल्हा दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या नियमांचं उल्लघंन करून पोलिसांनी मला अटक केली असून मारहाणही केल्याचा आरोप करत अर्णबने मुंबई पोलीस दलातील ९ अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

हेही वाचा - नाईक प्रकरण कोणाच्या सांगण्यावरून दाबलं? काँग्रेसची चौकशीची मागणी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा