Advertisement

वांद्रे टर्मिनसला द्या बाळासाहेबांचं नाव, खा. पूनम महाजन यांची मागणी

भाजपा खासदार पूनम महाजन यांनी शुक्रवारी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन वांद्रे टर्मिनस स्थानकाचं नाव बदलून ते हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे टर्मिनस असं नामकरण करण्यात यावं, अशी मागणी केली आहे.

वांद्रे टर्मिनसला द्या बाळासाहेबांचं नाव, खा. पूनम महाजन यांची मागणी
SHARES

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचं नामकरण झाल्याने शिवसैनिक सध्या आनंदात आहे. त्यातच भाजपा खासदार पूनम महाजन यांनी शुक्रवारी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन वांद्रे टर्मिनस स्थानकाचं नाव बदलून ते हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे टर्मिनस असं नामकरण करण्यात यावं, अशी मागणी केली आहे.


प्रस्ताव पाठवला

पूनम महाजन यांनी सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना २०१७ साली नामकरणाबाबतचा प्रस्ताव दिला होता. राज्य सरकारला देखील हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. राज्य सरकारनेही वांद्रे टर्मिनसच्या नामकरणाचा हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवण्याचं मान्य केलं आहे.



इतर प्रश्नांचा पाठपुरावा

याचसोबत खा. महाजन यांनी कुर्ला स्थानकाच्या पूर्वेकडील भाभा हॉस्पिटलपर्यंत फूट ओव्हर ब्रिज, विद्याविहार ते लोकमान्य टिळक टर्मिनस फूट ओव्हर ब्रिज, वांद्रे टर्मिनस ते खार रेल्वे स्थानक फूट ओव्हर ब्रिज, क्रांतीनगर, साबळेनगर तसंच तीन बंगला येथील रेल्वेखात्याच्या अखत्यारीतील जमिनीवर राहणाऱ्या राहिवाशांच्या निवासाचा प्रश्न इत्यादी प्रश्नासंदर्भात गोयल यांच्यासोबत चर्चा केली.


रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दखल घेतली आहे. राज्य सरकारकडून प्रस्ताव मागवून घेत त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी गोयल यांनी दिलं आहे.
- पूनम महाजन, खासदार



हेही वाचा-

शेतकरी मोर्चा पूनम महाजनांना शहरी माओवाद वाटतोय!

पूनम महाजन म्हणतात 'उत्तर भारतीय मुंबईची शान'



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा